नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांची नवी टीम जाहीर केली आहे. या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि हिना गावित यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. मात्र, नव्यानेच केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झालेल्या नारायण राणे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
जेपी नड्डा यांनी भाजपची 80 जणांची जम्बो टीम आज जाहीर केली. त्यात राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य, प्रवक्ते, सचिव, कार्यालयीन सचिव आणि कोषाध्यक्षांपासून ते राज्य प्रभारींचाही समावेश आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून एकूण 15 जणांचा समावेश आहे. त्यात चार नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम आहे. तर विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.
नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत 50 विशेष आमंत्रित आणि 179 स्थायी सदस्य असणार आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रत्रारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 309 घोषित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत मनेका गांधी आणि लखीमपूर हिंसेवरून योगी सरकारला आरसा दाखवणारे वरुण गांधी यांना स्थान देण्यात आलं नाही. मात्र, मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे.
नाराणय राणे यांना केंद्रात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यकारिणीत त्यांचा समावेश होईल असं सांगितलं जात होतं. मात्र, राणेंना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं नाही. उलट काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. मात्र, राणेंना स्थान दिलं गेलं नाही. नारायण राणे अजूनही भाजपमध्ये रुळलेले नाहीत. भाजपच्या संस्कृतीशी समरस झालेले नाहीत, त्यामुळे राणेंना संधी दिली नसावी, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
नितीन गडकरी
पीयूष गोयल
प्रकाश जावडेकर
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
चित्रा वाघ
विनोद तावडे
सुनील देवधर
पंकजा मुंडे
सुधीर मुनंगटीवार
आशिष शेलार
लड्डाराम नागवाणीं
सुनील वर्मा
हिना गावित
देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटील
सीटी रवी,
ओमप्रकाश धुर्वे
जयभान सिंग पवैय्या
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने राष्ट्रीय कार्यसमिति एवं राष्ट्रीय कार्यसमिति के लिए विशेष आमंत्रित और स्थायी आमंत्रित (पदेन) सदस्यों की नियुक्ति की। https://t.co/7FRFUICsx7
— BJP (@BJP4India) October 7, 2021
संबंधित बातम्या:
श्रीनगरमध्ये सरकारी शाळेवर दहशतवादी हल्ला! सर्वासामान्य नागरिकांवर गोळीबार, 2 शिक्षकांचा मृत्यू
गायीला वाचवताना डबल डेकर बस ट्रकवर धडकली, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, 13 प्रवाशांचा मृत्यू
तोपर्यंत मी लढतच राहणार, पीडितांच्या कुटुंबाला मी वचन दिलंय; प्रियंका गांधींचा योगी सरकारला इशारा
(JP Nadda announces new team of BJP, chitra wagh, shelar, mungantiwar in bjp’s national committee)