नवी दिल्ली: ज्येष्ठ पत्रकार कमाल खान हे शब्दांचे जादूगार होते. त्यांच्या नाराजीतही गोडवा होता. आपल्या पत्रकारितेतून सर्वांची मनं जिंकणारा असा हा अवलिया पत्रकार होता, अशी प्रतिक्रिया पत्रकारिता क्षेत्रातून उमटत आहेत.
एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झालं. ते एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक होते. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. ‘जनज्वार’ या संकेत स्थळाने कमाल खान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कमाल खान यांच्या बोलण्याची शैली अनोखी होती. अत्यंत साध्या आणि मोजक्या शब्दात ते मोठा आशय मांडायचे. आपल्या अनोख्या अंदाजाने ते आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचे.
बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांच्याशी त्यांनी तासभर चर्चा केली होती. त्यावेळी जनज्वारमध्ये त्यांनी घेतलेली मुलाखत शब्दश: छापण्यात आली होती. त्याला त्यांची बायलाईनही देण्यात आली होती. मायावतींची मुलाखत घेताना कमाल खान यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. त्यावेळी आम्ही तुमची ही मुलाखत छापणार आहोत असं त्यांना सांगितलं होतं. त्यावर बातमी लिहिल्यावर एकदा मला दाखवा असं ते म्हणाले होते. पण आम्ही त्यांना न दाखवताच बातमी छापली. त्यावर ते नाराज झाले. पण या नाराजीतही गोडवा होता. तुम्ही मला न दाखवताच बातमी छापली अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. त्यावर, तुम्ही रिपोर्टिंग करताना कुणाला दाखवूनच प्रसारित करता का? असा सवाल करताच ते हसले आणि त्यांची नाराजी दूर झाली, असं ‘जनज्वार’ने म्हटलं आहे.
कमाल खान यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना रामनाथ गोयंका पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गणेश शंकर विद्यार्थी अॅवार्डही देण्यात आलेला आहे. ते एनडीटीव्हीचे यूपीचे संपादक होते. एवढेच नव्हे तर रवीश कुमारही त्यांच्या प्राईम टाईममध्ये कमाल खान यांच्या बातम्या दाखवायचे.
We are all devastated by the loss of Kamal Khan, an NDTV veteran and one of the country’s best journalists. pic.twitter.com/NZSS2bQOR5
— NDTV (@ndtv) January 14, 2022
संबंधित बातम्या:
ज्या पत्रकाराची स्टोरी पाहण्यासाठी देश वाट पाहायचा, एनडीटीव्हीचे पत्रकार कमाल खान यांचं दु:खद निधन
चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; संजय राऊतांनाच खोचक टोला
Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, 2 लाख 64 हजार रुग्णांची नोंद, 315 मृत्यूंची नोंद