नवी दिल्ली : भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. कन्हैय्या कुमार हे शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित मानलं जात होतं. त्यानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थित या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोन तरुण नेतृत्वांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं काँग्रेसला आता नवं बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Kanhaiya Kumar and MLA Jignesh Mewani join Congress)
दिल्ली: सीपीआई नेता कन्हैया कुमार और गुजरात के विधायक जिग्नेश मेवाणी कांग्रेस नेता राहुल गांधी की मौजूदगी में कांग्रेस में शामिल हुए। pic.twitter.com/VUeGb2o5eD
— ANI_HindiNews (@AHindinews) September 28, 2021
कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी सातत्यानं मोदी सरकार आणि हिटलरशाही विरोधात संघर्ष केला आहे. आमच्या या साथीदारांना वाटलं ही हा आवाज अजून बुलंद व्हावा. त्यामुळे त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा आवाज आता काँग्रेस आणि राहुल गांधींच्या आवाजात मिळून ‘एक और एक ग्यारह’ होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
इन्होंने(कन्हैया कुमार और जिग्नेश मेवाणी) लगातार मोदी सरकार और हिटलरशाही की नीति के खिलाफ संघर्ष किया। हमारे इन साथियों को लगा कि ये आवाज़ और बुलंद हो पाएगी जब ये कांग्रेस और राहुल गांधी की आवाज़ में मिलकर एक और एक ग्यारह की आवाज़ बन जाएगी: रणदीप सिंह सुरजेवाला, कांग्रेस pic.twitter.com/85vhWuSgdA
— ANI_HindiNews (@AHindinews) September 28, 2021
कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ही बैठक शक्य तितकी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच काँग्रेसमधील बड्या नेत्यांनादेखील या भेटीची कल्पना नव्हती. खुद्द काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनादेखील कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांच्यात झालेल्या भेटीची खबर नव्हती. तर दुसरीकडे गुजरातमध्ये आमदार जिग्नेश मेवानी यांच्या रुपात काँग्रेसला तरुण आणि तडफदार चेहरा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मेवाणी यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत काँग्रेस प्रेवशाबाबत चर्चा करण्यात आली होती. हे दोन्ही नेते आता येत्या 28 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
अनेक राज्यांत केंद्रीय तसेच राज्य पातळीवर काँग्रेस खिळखिळी झाली आहे. बिहारसारख्या राज्यात काँग्रेसचे फक्त 19 आमदार आहेत. येथे आरजेडीसारख्या इतर प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्ष मजूबत करण्याकडे लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कन्हैयासारख्या तरुण नेत्याला पक्षात सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कन्हैया कुमार तरुण आणि तडफदार आहेत. तसेच तरुण, विद्यार्थ्यांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणं, मांडलेले मुद्दे चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे कन्हैया यांचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो, असा अदांज काँग्रेसमधील नेते बांधत आहेत. दरम्यान, कन्हैया कुमारने कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजप नेते गिरिराज सिंह यांनी त्यांना पराभूरत केलं होतं.
इतर बातम्या :
नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात; सिद्धूंचा पुढचा प्लॅन काय?
Kanhaiya Kumar and MLA Jignesh Mewani join Congress