लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला (Kanpur Road Accident 17 dead). कानपूरच्या किसान नगर येथील महामार्गावर एसी बस आणि टेम्पो एकमेकांना धडकल्याने हा अपघात घडला. यामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तब्बल 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यापैकी 10 जण गंभीर असल्याची माहिती आहे (Kanpur Road Accident 17 Dead And 30 Injured).
प्रत्यदर्शींच्यामते हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर संपूर्ण महामार्गावर मृतदेह इतरत्र पडलेले दिसत होते, तर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकादेखील कमी पडल्या होत्या. त्यामुळे जखमींना टेम्पो आणि अन्य गाड्यांमधून हॅलेट रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी लोडरच्या माध्यमातून अनेक जखमींना रुग्णालयात पोहोचवलं.
महामार्गावर DCM चा ड्रायव्हर बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता आणि यादरम्यान टेम्पो आणि बसचा अपघात झाला. या अपघातात जितक्या लोकांचा मृत्यू झालाय ते सर्व टेम्पोमध्ये होते. हे सर्व कानपूरच्या सचेंडी पोलीस ठाण्याहद्दीतील लाल्हेपुर गावातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व एका बिस्किट फॅक्टरीमध्ये काम करत होते आणि नाईट शिफ्टमध्ये काम करण्यासाठी फॅक्टरीत जात होते.
#UPCM श्री @myogiadityanath जी ने कानपुर के सचेंडी क्षेत्र में हुई सड़क दुर्घटना में लोगों की मृत्यु पर गहरा शोक व्यक्त किया है।
मुख्यमंत्री जी ने दिवंगत आत्माओं की शांति की कामना करते हुए मृतकों के शोक संतप्त परिजनों के प्रति अपनी संवेदना व्यक्त की है।
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) June 8, 2021
कानपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना दोन-दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पीएमओनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपघातावर शोक व्यक्त करत म्हटलं की राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदतीची घोषणा केलीये. गृहमंत्री अमित शाह यांनीही अपघातावर दु:ख व्यक्त केलं नाही.
यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जिल्हा प्रशासनाने अपघाताच्या कारणांचा तपास करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
प्रत्यदर्शींच्या मते जय अम्बे ट्रॅव्हल्सची स्लीपर बस कानपूर येथून गुजरातच्या सूरतला जात होती. बसमध्ये जवळपास 115 जण प्रवास करत होते. हे सर्व कानपूर येथून 15 किलोमीटरवर बस किसान नगरला पाहेचली, मागून येणाऱ्या DCM ने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान समोरुन येणारा टेम्पो या दोघांच्या मधे फसला आणि हा अपघात झाला. यमध्ये टेम्पोतील सर्व जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णालयात जागा कमी पडल्याने लोडरमध्ये टाकून अनेक मृतदेहांना रुग्णालयात नेण्यात आलं. एका लोडरमध्ये 7-7 शव ठेवून हॅलेट रुग्णालयात नेण्यात आले.
दोन रेल्वे सुसाट वेगाने एकाच ट्रॅकवर, भीषण धडकेत 30 प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी बोगीतच अडकले https://t.co/KYbUiEW0LX #PakistanTrainAccident | #TrainAccident
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2021
Kanpur Road Accident 17 Dead And 30 Injured
संबंधित बातम्या :
रात्रीची वेळ, सामसूम रस्ता, भरधाव कार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
रात्रीची वेळ, सामसूम रस्ता, भरधाव कार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू