बेंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समुदायातील नसावा, अशी सूचना पक्षश्रेष्ठींना केली आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Karnataka: Appoint non-Lingayat as next chief minister of Karnataka, says BS Yediyurappa)
बीएस येडियुरप्पा हे स्वत: लिंगायत समुदायातून येतात. भाजपचे कर्नाटकाचे प्रदेशाध्यक्षही लिंगायत समुदायातील आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांनी पुढचा मुख्यमंत्री त्याच समुदायातील नको असं सांगितलं आहे. त्यामुळे भाजप आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध घेत आहे.
येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चा रंगली आहे. एक दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाणार आहे. सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये प्रल्हाद जोशी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर कर्नाटकचे खासदार आहे. त्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. कुशल प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत.
येडियुरप्पा यांनी लिंगायत मुख्यमंत्री नको म्हणून सांगितलं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र, लिंगायतच मुख्यमंत्री हवा आहे. कर्नाटकात लिंगायत समुदायाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. या समुदायाशी सातत्याने संपर्क राहावा म्हणून संघाला याच समुदायातील मुख्यमंत्री हवा आहे. लिंगायत व्होट बँक ही भाजपची हक्काची व्होटबँक आहे. या व्होटबँकवरच कर्नाटकातील भाजपचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे संघाने ही मागणी पुढे रेटली आहे.
2018मध्ये कर्नाटकात भाजप सर्वाधिक जागा जिंकून नंबर वनचा पक्ष झाला होता. मात्र, बहुमतासाठीचा आकडा नसल्याने भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. केंद्रात दुसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर कर्नाटकात भाजप अॅक्टिव्ह झाला. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनामा दिला. त्यामुळे 2019मध्ये येडियुरप्पा मुख्यमंत्री बनले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येडियुरप्पा यांच्या कामाच्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे जात आहेत. त्यामुळे भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंह यांनी कर्नाटकात जाऊन मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांशी चर्चा केली होती.
कर्नाटक विधानसभेतील सदस्यांची संख्या 224 आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 119 जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यांना बहुमत मिळालं नव्हतं. तर काँग्रेसने 68 आणि जेडीएसने 32 जागांवर विजय मिळवला होता. तर अपक्षांचा दोन जागांवर विजय झाला होता. जेडीएसला कमी जागा मिळूनही काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता. (Karnataka: Appoint non-Lingayat as next chief minister of Karnataka, says BS Yediyurappa)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 26 July 2021 https://t.co/gFLxbyVNMB #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 26, 2021
संबंधित बातम्या:
कर्नाटकात नवा ट्वीस्ट, विधानसभा अध्यक्षांकडून 3 आमदारांचं निलंबन
कर्नाटक सरकार अवघ्या 4 मतांनी कोसळलं, भाजपचं ‘मिशन कमळ’ यशस्वी
दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं, पण कुमारस्वामींचं दोन्हीही वेळा ‘बॅड लक’
(Karnataka: Appoint non-Lingayat as next chief minister of Karnataka, says BS Yediyurappa)