कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Karnataka Omicron Cases) दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह (Maharashtra on alert) देश अलर्टवर आहे. पण संपूर्ण देशाला काळजीत टाकणारे अहवाल पुन्हा प्राप्त झालेत. जे दोन ओमिक्रॉन पेशंट आहेत त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचही टेन्शन वाढलं आहे. कारण कर्नाटक हा महाराष्ट्राचा शेजारी आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे बंगळुरूमध्ये जे दोन ओमिक्रॉनची लागण झालेले पेशंट सापडलेत, त्यातल्या एकानं कुठेही विदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळेच त्याला ओमिक्रॉनची लागण कुठून झाली हा मोठा सवाल आहे.
दोन रुग्ण आणि त्यांचा संपर्क
कर्नाटकची राजधानी बंगळुरूत हे दोन्ही ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण सापडलेले आहेत. त्यातला एक जण हा दक्षिण आफ्रिकेचा नागरीक आहे. त्याचं वय 66 वर्षे इतकं आहे. गेल्या महिन्यात तो दुबई मार्गे बंगळुरुत पोहोचलाय. तर दुसरा रुग्ण हा एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये काम करणारा 46 वर्षीय डॉक्टर आहे. विशेष म्हणजे डॉक्टरची कुठलीही प्रवासाची हिस्ट्रि नाही. म्हणजेच डॉक्टरनं कुठेही प्रवास केला नसेल तर त्याला ओमिक्रॉनची लागण झाली कुठून हा मोठा सवाल आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनाही ओमिक्रॉनचे माईल्ड सिम्पटम्पस (Omicron Symptoms) आहेत. ज्याला कुठेही प्रवास न करता ओमिक्रॉनची लागण झाली म्हणजेच बंगळुरुत इतरांना पण ओमिक्रॉनची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याची संख्या किती असेल वगैरे याचा प्राथमिक अभ्यास केला जातोय. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आरोग्य अधिकारी-डॉ. सी. नागराज म्हणाले की, ज्या रुग्णानं कुठेही प्रवास केल्याची नोंद नाही, त्याला जर ओमिक्रॉनची लागण झालेली असेल तर मग कम्युनिटी स्प्रेड चेक करावा लागेल.
We are very cautious. I’ve discussed this with Union Health Min. He said he’ll give further details (over 2 #Omicron cases). Our duty is now to track & trace such strains & their contacts wherever it’s found. We’re already tracking & tracing international travellers: Karnataka CM pic.twitter.com/oTAIC8H9Tg
— ANI (@ANI) December 2, 2021
विरोधाभास
बंगळुरुतल्या दोन्ही रुग्णांचा विरोधाभासही समोर येतोय. जे पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत ते डॉक्टरच्या संपर्कातले आहेत ज्याने कुठेही प्रवास केल्याची किंवा विदेशात गेल्याची नोंद नाही आणि जो पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे, त्याचे प्रायमरी संपर्कात आलेले 24 जण आणि त्या 24 जणांच्या संपर्कात आलेले 240 जणांचा रिपोर्ट हा नेगेटीव्ह आहे. म्हणजेच जो ओमिक्रॉनच्या हाय रिस्क देशातून (High Risk Countries) आला, त्याच्या संपर्कातला एकही कोरोन पॉझिटिव्ह नाही आणि जो बंगळुरुतच होता, त्याच्या संपर्कातले पॉझिटिव्ह आलेले आहेत.
हे सुद्धा वाचा:
Shankh Remedies : सुख-समृद्धीच्या शोधात असाल तर शंखशी संबंधित हे उपाय निश्चितपणे करा
Weather: थंड वाऱ्यांनी गारठलं औरंगाबाद, मराठवाड्यातील सर्वात कमी तापमान, काय सांगतोय आजचा अंदाज?
इन्स्टाग्रामवर तुमचा आवडता कंटेट पहायचाय? मग ही सोपी युक्ती करा; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस