चित्रदुर्ग: कर्नाटकातील (Karnataka)श्री मुरुघ मठाचे मुख्य पुजारी (Chief pontiff of Sri Murugha Mutt)शिवमूर्ती मुरुघा शरणारु (Shivamurthy Murugha Sharanaru) यांना अटक करण्यात आली आहे. मठाच्या शाळेत शिकणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी शरणारु यांना अटक केली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान हर्द्यात दुखत असल्याच्या कारणावरुन शिवमूर्ती मुरुघ शरणारु यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अटक केल्यानंतर शरणारु यांना चित्रदुर्ग जिल्ह्या कारागृहात पाठवण्यात आले होते. दुसरीकडे पोलीस उद्या ओपन कोर्टात शरणारु यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.
#UPDATE | Karnataka: Chief pontiff of Sri Murugha Mutt Shivamurthy Murugha Sharanaru shifted to district hospital after he complained of chest pain
He was kept in Chitradurga district jail https://t.co/VyP6Tubtxn
— ANI (@ANI) September 2, 2022
काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाचे नेते डी के शिवकुमार, केसी वेणुगोपाल यांच्यासह ऑगस्टमध्ये चित्रदुर्गच्या मरुघा मठात आले होते. मुरुघा मठ हे एक प्रभावशाली संस्थान आहे. याठिकाणी नियमित रुपात अनेक राजकीय नेते येत-जात असतात. शरणारु यांनी राहुल गांधी यांना लिंगादीक्षा दिली होती. या विधीतून कोणत्याही व्यक्तीला लिंगायत समाजात येण्यासाठी आंमित्रत केले जाते.
#WATCH | Karnataka: Chief pontiff of Sri Murugha Mutt Shivamurthy Murugha Sharanaru being taken to ICU ward of dist hospital, Chitradurga.
He was brought here after he complained of chest pain. He has been sent to 14-day judicial custody in case of sexual assault of minor girls. pic.twitter.com/zhPVpi1nen
— ANI (@ANI) September 2, 2022
शिवमूर्ती मुरुघा शरणारु यांच्यावर अ्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या पीडित मुलींनी न्यायाची मागणी करत म्हैसूर येथील ओदानदी या एनजीओशी संपर्क केला होता. त्यांना २६ ऑगस्ट रोजी म्हैसूरच्या बाल कल्याण समितीच्या समोर हजर करण्यात आले होते. त्यात दिवशी रात्री मुरुघा शरम यांच्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ज्या मुलींनी आरोप केले आहेत, त्या मुली या मठाद्वारे संचलित करण्यात येत असलेल्या शाळेत शिकतात. त्यांचे वय १५ ते १६ वर्षांचे आहे. या संताने त्यांचे साडे तीन वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पीडित मुली २४ जुलै रोजी हॉस्टेलमधून निघाल्या आणि २५ जुलै रोजी कॉटनपेट पोलीस ठाण्यात पोहचल्या होत्या. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी म्हैसूरच्या नजराबाद पोलीस ठाण्यात या लिंगायत संताविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली..