Kashi Vishwanath Corridor: हम आप सब काशीवासी लोगोनसे प्रणाम करत है; ज्या भाषेतून मोदी बोलले ती बोली माहीत आहे का?

| Updated on: Dec 13, 2021 | 4:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाषा याचा अन्यन साधारण संबंध आहे. मोदी ज्या राज्यात तिथल्या बोली भाषेत स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.

Kashi Vishwanath Corridor: हम आप सब काशीवासी लोगोनसे प्रणाम करत है; ज्या भाषेतून मोदी बोलले ती बोली माहीत आहे का?
Narendra Modi
Follow us on

वाराणासी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाषा याचा अन्यन साधारण संबंध आहे. मोदी ज्या राज्यात तिथल्या बोली भाषेत स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. भाषा येत नसली तरी तिथल्या भाषेतील एक दोन वाक्य तरी ते हमखास बोलतात. भाषणाच्या सुरुवातीलाच स्थानिक बोलीतून संवाद साधत ते आधी श्रोत्यांच्या मनाची पकड घेतात आणि मग जोरदारा बॅटिंग करत आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करतानाही मोदींनी काशीच्या खास काशिका भाषेत जनतेशी संवाद साधला. मोदींच्या या संवादाला उपस्थितांनीही जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

काशिका भाषेचा इतिहास काय?

ही काशीत बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळेच या भाषेला काशिका हे नाव पडलं. ही एक आर्य भाषा आहे. तिला काशिका भाषा किंवा काशिका भोजपुरी असंही संबोधलं जातं. भोजपुरी आणि अवधी भाषेच्या मिश्रणातून काशिका भाषा तयार झाली आहे.

किती लोक ही भाषा बोलतात?

काशिका भाषा केवळ वाराणासीशीच मर्यादित असली तरी ही भाषा देशभरात 50 लाख लोक बोलतात. वाराणासीतील लोक देशात ज्या ज्या भागात राहतात तिथे ते बाहेर स्थानिक भाषेत संवाद साधतात. तर घरी आपल्याच काशिका या बोली भाषेतून संवाद साधत असतात.

फक्त बोलण्यातील भाषा

काशिका किंवा काशिका भोजपुरी भाषा ही केवळ बोलचालीतील भाषा आहे. लिखापढीसाठी हिंदी भाषेचा वापर केला जातो. या भाषेची स्वतंत्र अशी लिपी नाही. या भाषेत फारसं साहित्यही नाही. या भाषेचा स्वतंत्र असा शब्दकोश नाही. हिंदू, ऊर्दू आणि भोजपुरीतील शब्दांवर ही भाषा पोसली गेली आहे.

 

मोदी काशिका भाषेत नेमकं काय म्हणाले?

बाबा विश्वानाथ के चरणो में हम शीश नमावत है
माता अन्नपूर्णा के चरणंकं बार बार वंदन करत है
हम बाबा विश्वनाथ के दरबार से देश के दुनिया के उस श्रद्धालू जनं से प्रणाम करत है, जो अपने अपने स्थान से इस महायज्ञ के साक्षी बनत होन
हम आप सब काशीवासी लोगोनसे प्रणाम करत है, जिनके सहयोग से इस शुभ घडी आयल ह, हृदय गदगद हस, मन अल्हादित ह, आप सब लोगोन के बहत बहत बधाई ह

संबंधित बातम्या: 

Kashi Vishwanath Corridor: तो शिवाजी भी उठ खडे होते हैं, दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण, साधू संतांकडून टाळ्यांचा गडगडाट

Kashi Vishwanath Corridor: काशी विश्वनाथ धाम हे परंपरा,आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचं प्रतिक: नरेंद्र मोदी

Kashi Vishwanath Corridor| पंतप्रधान मोदींचे काशी विश्वनाथाच्या साक्षीने तीन संकल्प; देशासाठी जनता जनार्दनाला साकडे!