जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षापथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यात सैन्याचे तीन जवान जखमी झाले आहेत. गोळीबारात एक पोलीस जखमी झालाय. सुरक्षापथकांनी आज सकाळी कुलमगामच्या आदिगाम भागात सर्च ऑपरेशन राबवलं होतं. 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षापथकांनी सुद्धा कारवाई केली. सुरक्षापथकं आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबारात जवान जखमी झाले आहेत. शोध मोहिम सुरु आहे. संपूर्ण परिसराला आर्मी आणि पोलिसांनी घेराव घातला आहे. जॉइंट ऑपरेशन चालवून दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा एजन्सींचा सहभाग आहे. प्रशासनाची सगळ्या परिस्थितीवर नजर आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर सतत प्रहार सुरु आहे. खोऱ्यात दहशतवादाला लगाम घालण्यासाठी सतत सर्च ऑपरेशन्स सुरु आहेत. अलीकडेच किश्तवाडच्या गुरिनाल गावात सुरक्षापथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.
#WATCH | Kulgam, J&K: Based on specific intelligence input, a Joint Operation was launched by the Indian Army & Jammu and Kashmir today at Arigam, Kulgam. During the search terrorists fired indiscriminately and a firefight ensued. Operation is in progress.
(Visuals deferred by… pic.twitter.com/SSVy8C7mth
— ANI (@ANI) September 28, 2024
पुलवामामध्ये मोठा कट उधळला
शोध मोहिमेदरम्यान या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. म्हणून सुरक्षा पथकांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु झाला. आधी कठुआ आणि पूंछमध्ये सुरक्षापथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावला होता. पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या 6 सहाय्यकांना अटक केली. युवा वर्गाला हेरुन त्यांना आपल्यासोबत जोडण्याच काम हे करत होते. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला.