Kashmiri Pandit : काश्मिरात पुन्हा एकदा काश्मिरी पंडिताची हत्या; शोपियांमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार

| Updated on: Aug 16, 2022 | 1:32 PM

Kashmiri Pandit : सुनील भट्ट आणि त्यांचा भाऊ पिंटू भट्ट सफरचंदाच्या बगीच्यात जात होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना त्यांचं नाव विचारलं. या दोघांनी आपलं नाव सांगताच अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सुनील कुमार भट्ट यांचा मृत्यू झाला. या गोळीबारात पिंटू ऊर्फ पर्टिंबर नाथ हे गंभीर जखमी झाले आहेत.

Kashmiri Pandit : काश्मिरात पुन्हा एकदा काश्मिरी पंडिताची हत्या; शोपियांमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार
काश्मिरात पुन्हा एकदा काश्मिरी पंडिताची हत्या; शोपियांमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शोपियां: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काल देशभर जल्लोषात साजरा झाला. त्यानंतर आज जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) आज सहा जवान शहीद झाले आहेत. बस दरीत कोळल्याने झालेल्या दुर्घटनेत हे सहा जवान शहीद झाले. ही घटना ताजी असतानाच शोपियांच्या छोटीपुरा परिसरातील एका सफरचंदाच्या बागेत एका नागरिकाला दहशतवाद्यांनी  (terrorist) गोळ्या घातल्या. त्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. मृत व्यक्ती आणि जखमी व्यक्ती दोघेही हिंदू आहेत. हे दोघेही काश्मीरी पंडित (Kashmiri Pandit) असून दोघेही सख्खे भाऊ आहे. मृत व्यक्तीचं नाव सुनील कुमार भट्ट आहे. तर जखमी व्यक्तीचं नाव पिंटू कुमार भट्ट असं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येचं सत्रं सुरूच असल्याने काश्मीरमधील जनता हादरून गेली आहे. या घटनेनंतर स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुनील भट्ट आणि त्यांचा भाऊ पिंटू भट्ट सफरचंदाच्या बगीच्यात जात होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना त्यांचं नाव विचारलं. या दोघांनी आपलं नाव सांगताच अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सुनील कुमार भट्ट यांचा मृत्यू झाला. या गोळीबारात पिंटू ऊर्फ पर्टिंबर नाथ हे गंभीर जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

भ्याड हल्ला

शोपियाच्या छोटेपोरा येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे. हल्ल्यानंतर पिंटू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, भाजप नेते निर्मल सिंह यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. हा भ्याड हल्ला असल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे. सुनील कुमार त्याचं काम करत होता. तरीही अतिरेक्यांनी त्याला ठार केले. अतिरेक्यांनी कितीही प्रयत्न करावेत. पण ते त्यांना दहशत निर्माण करण्यात यश येणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला आहे.

सहा जवान शहीद

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाचे जवान, बाहेरचे मजदूर आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. गेल्या दोन दिवसात दोन पोलीस शहीद झाले आहेत. तसेच एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. एक नागरिकही त्यात जखमी झाला आहे. तर बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज सहा जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे काश्मीर खोरं हादरून गेलं आहे.