केरळमधील पल्लकडमध्ये, 27 वर्षीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. एस संजीथ नावाचा कार्यकर्ता सोमवारी पत्नीसह सकाळी बाहेर जात होता तेव्हा वाटेत काही हल्लेखोरांनी त्यांना अडवून धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी लगेच तीथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ पोहोचले आणि संजीथला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली.
Kerala | An RSS worker hacked to death in Palakkad around 9 am today; attacked while traveling with his wife. Details awaited, as per Police
— ANI (@ANI) November 15, 2021
हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष केएम हरिदास यांनी या हत्येसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाला जबाबदार धरले आहे. ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ची राजकीय शाखा आहे.
केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची अशा प्रकारे हत्या होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी फेब्रुवारीमध्येही एका आरएसएस कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ भाजप आणि हिंदू संघटनांनी राज्यात बंदची हाक दिली होती.
हे ही वाचा