तिरुवनंतपूरम: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटातून सावरण्यासाठी केरळ सरकारने 20 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. तसेच 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या मोफत लसीकरणासाठी एक हजार कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे. त्याशिवाय मोफत लसीकरणासाठी संबंधित उपकरणे आणि सुविधा देण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (Kerala government announces Rs 20,000 crore second COVID package)
राज्याचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी ही माहिती दिली. मागच्यावेळीही 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याचा महामारी रोखण्यासाठी वापर करण्यात आला. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे दुसऱ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे, त्यांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवणे आणि कोरोना रोखण्यासाठी उपया योजना करण्यासाठी हे 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असं बालगोपाल यांनी सांगितलं. तसेच राज्यातील जनतेवर कोणताही नवा कर लादण्यात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशात कोरोनाचं संकट सुरूच आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पुनरुज्जीवीत करण्याचा मागच्या बजेटचा उद्देश होता. मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. म्हणून यावेळी कोरोनावर पूर्ण रोखणं हे आमचं उद्दिष्टं आहे, असं सांगतानाच ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोविड रोखण्यासाठी मोठ्या बजेटची गरज पडणार आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, कोरोना संकटामुळे नोकरी गमावलेल्यांना आर्थिक मदत देणं सुरू ठेवावं लागेल, असं ते म्हणाले. या पॅकेजमध्ये मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्याने या वर्षी 6.6 टक्के आर्थिक विकास दराचं लक्ष्य ठेवलं आहे, असंही ते म्हणाले. (Kerala government announces Rs 20,000 crore second COVID package)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 4 June 2021 https://t.co/0ENzNZ0AQX #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021
संबंधित बातम्या:
‘धोतरवाले मोदी’, ‘केरळचे स्टॅलिन’… मुख्यमंत्री पिनराई विजयन नक्की कोण?; वाचा सविस्तर
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट, कोरोनाबळींची संख्याही घसरली
(Kerala government announces Rs 20,000 crore second COVID package)