नवी दिल्ली: नीती आयोगाने राज्यांचं हेल्थ कार्ड जारी केलं आहे. आयोगाने जारी केलेल्या हेल्थ इंडेक्समध्ये दक्षिणेकडील राज्यांनी बाजी मारली आहे. देशात आरोग्य सेवा देण्यात केरळ राज्य अव्वल ठरलं आहे. तर महाराष्ट्र पाचव्या स्थानी आहे. आरोग्य सेवा देण्याच्या इंडेक्समध्ये बिहार 18 व्या आणि उत्तर प्रदेश 19 व्या स्थानावर आहे.
नीती आयोगाने जारी केलेल्या हेल्थ इंडेक्समध्ये केरळ पहिल्या, तामिळननाडू दुसऱ्या, तेलंगना तिसऱ्या, आंध्रप्रदेश चौथ्या, महाराष्ट्र पाचव्या आणि गुजरात सहाव्या स्थानी आहे. या इंडेक्समध्ये राजस्थान 16व्या, मध्यप्रदेश 17व्या, बिहार 18व्या आणि उत्तर प्रदेश 19व्या स्थानी आहे.
नीती आयोगाने दिलेल्या माहितीनुसार हेल्थ इंडेक्ससाठी चार राऊंडमध्ये सर्व्हे करणअयात आला. त्यानंतर स्कोअरिंग करण्यात आली. या चारही राऊंडमध्ये केरळच टॉपला राहिला. केरळचा ओव्हरऑल स्कोअर 82.20 होता. तर दुसऱ्या नंबरवरील तामिळनाडूचा स्कोअर 72.42 इतका होता. तर उत्तर प्रदेशचा स्कोअर सर्वात कमी होता. उत्तर प्रदेशचा स्कोअर 30.57 एवढा होता.
उत्तम आणि दर्जेदार सेवा देण्यात छोट्या राज्यांमध्ये मिझोराम पहिल्या स्थानावर आहे. या यादीत त्रिपुरा दुसऱ्या क्रमांकावर असून नागालँड शेवटच्या स्थानावर आहे. तर केंद्र शासित प्रदशांमध्ये दादरा नगर हवेली पहिल्या, चंदीगड दुसऱ्या आणि दिल्ली पाचव्या स्थानावर आहे.
दरम्यान, या सर्व्हेत कोरोना काळात राज्यांनी दिलेल्या आरोग्य सुविधांचाही आढावा घेण्यात आल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे या सर्व्हेत भाजपशासित राज्य मागे आहेत. तर भाजपचं सरकार नसलेली राज्य सर्वात पुढे आहेत. हेल्थ इंडेक्समधील पहिल्या पाचही राज्यांमध्ये भाजप शासित एकाही राज्याचा समावेश नाही. केरळ, तामिळनाडू, तेलंगना, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या पाचही राज्यात भाजपची सरकारने नाहीत. विशेष केंद्रातही भाजपची सत्ता असताना पहिल्या पाचमध्ये भाजप शासित राज्य नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 27 December 2021 pic.twitter.com/GFc4AJvllD
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2021
संबंधित बातम्या:
अंत्यसंस्कारासाठी लोक निघाले, वृद्धाने अचानक श्वास घेतला, डोळेही उघडले!