Car Accident : भीषण अपघात, प्रसिद्ध पान मसाला कंपनीच्या मालकाच्या पत्नीचा मृत्यू

| Updated on: Sep 14, 2024 | 2:30 PM

Car Accident : खासगी समारंभात सहभागी होण्यासाठी चालले होते. करहल जवळ आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे वर किलोमीटर 79 जवळ अचानक गाडीचा टायर फुटला.

Car Accident : भीषण अपघात, प्रसिद्ध पान मसाला कंपनीच्या मालकाच्या पत्नीचा मृत्यू
Car Accident
Follow us on

सुप्रसिद्ध केसर पान मसाला कंपनीचे मालक हरीश मखीजा यांची पत्नी प्रीति मखीजा यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात दारु व्यावसायिक तिलक राज शर्मा यांची पत्नी आणि गाडीचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. केसर पान मसाला कंपनीचे मालक हरीश मखीजा हे पत्नी आणि तिलक राज शर्मा, दीपक कोठरी यांच्यासह वेगवेगळ्या गाड्यांमधून कानपूरवरुन आग्र्याला खासगी समारंभात सहभागी होण्यासाठी चालले होते. करहल जवळ आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे वर किलोमीटर 79 जवळ अचानक गाडीचा टायर फुटला. कार पलटी होऊन डिवायडरला जाऊन धडकली.

यूपीडाची रुग्णवाहिका आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. जखमींना सैफई मेडिकल यूनिवर्सिटी येथे उपचारासाठी नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी प्रीति मखीजा यांना मृत घोषित केलं. त्यांचा ड्रायव्हर आणि तिलक शर्माची पत्नी यांना उपचारासाठी ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलय.

प्रिती मखिजा कारच्या बाहेर पडल्या

शुक्रवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. कानपुरहून आग्र्याच्या दिशेने जाणारी कीया करनेवाल कार अचानक टायर फुटल्याने अनियंत्रित झाली. डिवायडरला धडकून पलटी झाली. अपघाताच्यावेळी प्रिती मखिजा कारच्या बाहेर पडल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

इमर्जन्सी ट्रामा सेंटरमध्ये घेऊन गेले

कारमध्ये बसलेले अन्य दोघे जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या यूपीडाच्या रुग्णवाहिकेने जखमींना उत्तर प्रदेश आयुर्विज्ञान विश्वविद्यालय इमर्जन्सी ट्रामा सेंटरमध्ये घेऊन गेले. तिथे तपासल्यानंतर डॉक्टरांनी प्रीती मखीजा यांना मृत घोषित केलं. दीप्ति कोठरी आणि मखीजा यांचा ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय.