काळ आला होता, पण वेळ नाही, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू जम्मू-काश्मीरमध्ये थोडक्यात बचावले

| Updated on: Apr 08, 2023 | 9:50 PM

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे आज थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्यासोबत आज एक अनपेक्षित प्रकार घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पण या दुर्घटनेतून ते सुखरुप बचावले आहेत.

काळ आला होता, पण वेळ नाही, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू जम्मू-काश्मीरमध्ये थोडक्यात बचावले
Follow us on

श्रीनगर : केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा गाडीचा अपघात (Kiren Rijiju car accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत किरण रिजिजू हे थोडक्यात बचावले आहेत. याशिवाय इतर कुणीही जखमी झालेलं नाही. किरण रिजिजू हे पूर्णपणे ठीक आहेत. त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. पण त्यांच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

किरण रिजिजू आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांचा ताफा आज जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गाने जात होता. यावेळी एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. काही क्षणासाठी तिथे गोंधळलेली परिस्थिती बघायला मिळाली. या दरम्यान सुरक्षा रक्षकांनी तातडीने किरण रिजिजू यांना दुसऱ्या गाडीत बसवलं.

हे सुद्धा वाचा

संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली. संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत रिजिजू यांची कार आणि ट्रक दिसत आहे. तसेच घटनेनंतर सुरक्षा रक्षक किरण रिजिजू यांच्या गाडीच्या दिशेला पळत जाताना दिसत आहेत. ते किरण रिजिजू यांना अपघातग्रस्त कारमधून दुसऱ्या कारमध्ये बसवतात.

या घटनेवर रामबन पोलिसांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आज रस्ते मार्गाने जम्मू येथून श्रीनगर जाताना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या कारचा अपघात झाला. या दुर्घटनेत कुणीही जखमी नाही. किरण रिजिजू यांच्या त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.