नवी दिल्ली : देशाच्या प्रजासत्ताक दिवशी राजधानी दिल्लीत हाहा:कार उडाला आहे (Kisan Tractor Rally). केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शांत, संयमी आंदोलनाने अचानक उग्र रुप धारण केलं आहे. काही भागात आंदोलक शेतकऱ्यांकडून नियमांचं पालन करुन शांततेत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. मात्र, काही आंदोलक शेतकऱ्यांचा जथ्याने थेट दिल्ली पोलिसांवर हल्ला चढवला. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे (Kisan Tractor Rally).
#WATCH Violence continues at ITO in central Delhi, tractors being driven by protestors deliberately try to run over police personnel pic.twitter.com/xKIrqANFP4
— ANI (@ANI) January 26, 2021
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयमाचा बांध आज अखेर प्रजासत्ताक दिनी फुटला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीसाठी दिल्ली पोलिसांनी काही अटी ठेवल्या होत्या. मात्र, या अटींना धुडकावत शेतकरी दिल्लीत शिरले. दिल्ली पोलीस मुख्यालय ते राजपथाबाहेर आंदोलक शेतकरी धडकले. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. अनेक आंदोलकांकडून पोलिसांवार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकत काही पोलीस जखमी झाले. आंदलकांचं उग्र रुप पाहता पोलिसांनीदेखील आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांवर लाठीचार्ज सुरु केला. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाला. या भयानक हिंसक वातावरणाने संपूर्ण दिल्ली हादरली.
लाल किल्ल्यावर पोलीस आणि आंदोलक आमनेसामने
आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्याला ताब्यात घेतलं होतं. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनी देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला जातो. मात्र, याठिकाणी काही आंदोलकांनी तलवारी बाहेर काढत प्रदर्शने केली. आंदोलकांनी काही वेळ तिथे प्रदर्शने दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी शांततेने आंदोलकांना लाल किल्ल्यावरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले.
हेही वाचा : प्रजासत्ताक दिनी दिल्ली धुमसली, शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक, संयमी रॅली ते अंसतोष, वाचा सविस्तर