उत्तर भारतात कडाक्याची थंडी का पडते?; भूगोल आणि बर्फवृष्टीचा काय आहे संबंध? जाणून घ्या

| Updated on: Dec 20, 2020 | 8:30 AM

शात सर्वत्र थंडी वाढत आहे. उत्तर भारतात तर शीत लहरच सुरू झाल्याने कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. (know all about Reason of cold weather northern India)

उत्तर भारतात कडाक्याची थंडी का पडते?; भूगोल आणि बर्फवृष्टीचा काय आहे संबंध? जाणून घ्या
Follow us on

नवी दिल्ली: देशात सर्वत्र थंडी वाढत आहे. उत्तर भारतात तर शीत लहरच सुरू झाल्याने कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. उत्तर भारतात सकाळी सकाळी प्रचंड गार हवा असते. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडण्यामागे भूगोल कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे हा भाग अक्षांश रेखीय परिसराशी जवळ असल्याने या ठिकाणी कडाक्याची थंडी पडत असते. (know all about Reason of cold weather northern India)

दिल्लीबाबत सांगायचे झालं तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तिन्ही डोंगराळ प्रदेशाजवळ दिल्ली आहे. त्यामुळे या डोंगराळ भागातून येणारी बर्फाच्छादित हवा दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात येते. दरवर्षी असं होतं. 15 नोव्हेंबरपासूनच हिमाचल, जम्मू आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होते. पश्मिमी विक्षोभामुळेही या परिसरात थंड वारे वाहतात. ही थंडी कशी असेल हे अक्षांश रेषाच ठरवत असतात.

पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचं भौगोलिक स्थान अक्षांक्ष आणि देशांतराने ठरविले जाते. कोणत्याही देशातील जागेचं ठिकाण यामुळेच ठरविले जाते. तज्ज्ञांच्या मते अक्षांश रेषांचा हवामानाशी प्रचंड जवळचा संबंध असतो. त्यामुळे एखाद्या भौगोलिक ठिकाणी सूर्याची किती ऊर्जा मिळेल हे अक्षांश रेषाच ठरवतात. हिमाचल,

थंडीचं आणखी एक मोठं कारण

थंडीच्या काळात सूर्य पृथ्वीपासून दूर जातो. त्यामुळेही थंडी पडत असल्याचं सांगितलं जातं. पृथ्वी सूर्याच्या चोहोबाजूने फिरत असते. तो अंडाकार परवलयाकार असतो. तेव्हा प्रत्येकवेळी सूर्य आणि पृथ्वी दरम्यानचं अंतर समान असतं. थंडीत सूर्य हा पृथ्वीपासून दूर जातो. त्यामुळेच थंडी पडते, असं मानलं जातं.

म्हणून बर्फाळ हवा येते

पश्चिमी विक्षोभ आपल्याबरोबर भूमध्यसागर आणि अटलांटिक महासागरहून थंडी आणतो. भारतात येईपर्यंत ही थंडी प्रचंड वाढते. हे वारे जेव्हा हिमायलयाला धडक देतात तेव्हा ऐन थंडीतही पाऊस पडतो. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात बर्फ पडतो. त्यामुळेही थंडी पडते.

हवामान खात्याचा इशारा

यंदा ला नीनामुळे प्रचंड थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. ला नीना हा स्पॅनिश शब्द आहे. त्याचा अर्थ लहान मुलगी असा होतो. मेट्रोलॉजिकल भाषेत पू्र्व प्रशांत महासागर क्षेत्रात मध्यम हवेचा दबा निर्माण होऊन होणाऱ्या परिस्थितीला ला नीना हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे समुद्र सपाटीचं तापमान अत्यंत कमी होतं. त्याचा जगभरातील तापमानावर परिणाम होत असतो. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार तापमान सामान्यपणे 4 ते 5 डिग्री सेल्सिअसच्या खाली आले तर थंडी पडली असं समजलं जातं. हेच तापमान 6 ते 7 डिग्रीपर्यंत आलं तर त्याचा अर्थ कडाक्याची थंडी पडल्याचं मानलं जातं. एकंदरीत उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडण्याची ही कारणे आहेत. (know all about Reason of cold weather northern India)

 

संबंधित बातम्या:

LIVE : राज्यात थंडी वाढली, नागपुरात पारा 1.2 अंश सेल्सिअसनं खाली

अयोध्येत होत असलेली मशिद कशी आहे ? वाचनालय, रूग्णालय आणि बरंच काही, स्पेशल रिपोर्ट

लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई नको, ‘या’ कारणांमुळे आदर पुनावाला यांची सरकारकडे मागणी

(know all about Reason of cold weather northern India)