मुंबईः जगात ज्या देशाचा उल्लेख लोकशाहीचा (Democracy) देश म्हणून केला जातो, त्या भारतात (India) प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरा केला जातो. यानिनित्त शाळा-कॉलेजात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून हा राष्ट्रीय सन आनंदात साजरा होतो. राष्ट्राच्या या उत्सवातील या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. साऱ्या जगात देशाची प्रतिमा प्रजासत्ताक देश म्हणून निर्माण होणे याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. लोकशाहीचा देश म्हणून ओळख निर्माण केलेल्या या भारतात प्रत्येक गोष्टीला कायद्याची बाजू असते. समाजात वेगवेगळे गट तट निर्माण झाले असले तरी देशातील प्रत्येक घटकाला व्यवस्थेत सामावून घेण्याला संविधानाची खूप मोठी भूमिका असते. देशात श्रीमंत असो की गरीब असो, आमदार असो की, खासदार असो किंवा सामान्य नागरिक असो प्रत्येकाला कायदा समान आहे. त्याला जबाबदार आहे ते म्हणजे भारतीय संविधान. देशाच्या संविधानातील या महत्वाच्या गोष्टी ;
देशात कायद्याच्या आधारावर चालावा म्हणून भारतात 1950 मध्ये संविधान लागू केले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान अवलंबविले तर 26 जानेवारी 1950 या दिवशी लोकशाही प्रणालीबरोबर संविधान लागू केले गेले आहे. 2 वर्षे 11 महिने 18 दिवसानंतर संविधान लागू करून भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले गेले.
भारतात संविधान 1950 मध्ये लागू करण्यात आले होते. देशाला स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र बनवून देश कायद्यावर चालण्यासाठी 26 रोजी 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान अंमलात आणले. तर 26 जानेवारी 1950 पासून संविधानाला लोकशाही प्रणालीसह लागू केले गेले. याचाच अर्थ 2 वर्षे 11 महिने 18 दिवसानंतर संविधान लागू करून देशाला पूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले.
भारत पूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र बनविण्यासाठी देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आणण्यासाठी 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय संविधान सभेने संविधानाचा स्विकार केला होता. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून लोकशाही तत्व स्वीकारून संविधान लागू केले गेले, म्हणून या साली पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला.
भारतात संविधान लागू झाल्यानंतर हा देश कायदा आणि लोकशाही मानणारा आहे असं चित्र साऱ्या जगभर निर्माण झाले. 26 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीनंतर ध्वजारोहण करून देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले.
प्रजासत्ताक भारतात 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्ये हे आहे की, प्रजासत्ताक दिनाची सुरुवात 23 जानेवारीपासून म्हणजेच सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून सुरू होणार आहे. मागील वर्षापासून हा प्रजासत्ताक दिन 24 जानेवारीपासून सुरू होत होता. यावेळी मात्र इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीचे विलिनीकरण राष्ट्रीय युद्ध स्मारकात करण्यात आले
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 26 जानेवारी 1930 मध्ये देशाला संपूर्ण स्वराज्य घोषित केले होते.यादिवशी भारताचा स्वतंत्र दिवस म्हणून पहिल्यांदा घोषित केला गेला होता. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत 26 जानेवारीलाच स्वातंत्र्यता दिवस म्हणून साजरा केला जात होता. त्यामुळे या देशाला संपूर्ण स्वराज्य मिळाल्याची तारीख 26 जानेवारी 1930 आहे, त्यामुळे या दिवसाला महत्व प्राप्त करून देण्यासाठी 26 जानेवारा 1950 रोजी या देशाला संविधान लागू करण्यात आले आणि प्रजासत्ताक दिवस म्हणून घोषित करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीतील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या समारोपाला राष्ट्रपतींना भव्य संचलनाची सलामी दिली जाते.तर राज्याराज्यातून प्रजासत्ताक दिनानिनित्त राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.तसेच स्वातंत्र्यादिनानिमित्त दिल्ली पंतप्रधानांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण केले जाते आणि राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. त्यामुळे अशा विविध घटनांमुळे प्रजासत्ताक दिनाला देशाभरात अनन्यसाधारण महत्व आहे.
संबंधित बातम्या