PM Narendra Modi Birthday : वादळ येवो की बॉम्बस्फोट होवो, खरचटणारही नाही, पंतप्रधान मोदी यांची धाकड कार; काय आहे कारचे वैशिष्ट्ये?

| Updated on: Sep 17, 2023 | 11:15 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे प्रमुख असल्याने त्यांच्या ताफ्यात अनेक प्रकारच्या उच्च सेक्युरीटी असलेल्या कार असतात. स्वत: मोदी यांची कार हाय सेक्युरीटी प्रोटेक्शन असलेली आहे. पंतप्रधानांच्या कारचं असं काय वेगळंपण असतं? असा प्रश्न अनेकांना पडत असतो.

PM Narendra Modi Birthday : वादळ येवो की बॉम्बस्फोट होवो, खरचटणारही नाही, पंतप्रधान मोदी यांची धाकड कार; काय आहे कारचे वैशिष्ट्ये?
PM Modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशभरात त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टींचं कुतुहूलही व्यक्त केलं जात आहे. मोदींचा पगार किती आहे? मोदींची संपत्ती किती आहे? मोदी कोणत्या कारमधून प्रवास करतात? मोदींची गाडी शाही आहे का? त्यांच्या कारचं काय वैशिष्ट्ये असेल? किती लोक त्या कारमध्ये बसू शकतात? देशातील सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीला कोणती गाडी दिली जाते? असे असंख्य प्रश्न देशातील सामान्य नागरिकांच्या मनात असतात. आज त्यातील काही प्रश्नांचा मागोवा घेऊया.

पंतप्रधानांना केवळ लग्झरी फिचर्सने पॅक्ड कार दिल्या जात नाहीत तर या कारमध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. पंतप्रधानांच्या कारमध्ये कोणती सेफ्टी फिचर्स असतात हे कधीच सांगितलं जात नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हे सांगितलं जात नाही. मात्र, तरीही या कारबाबत कुतुहूल जाणवणाऱ्या बातम्या येत असतात. काही रिपोर्ट्स प्रसिद्ध होतात. त्यातून ही माहिती समोर येत असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार हायटेक सेक्युरिटी फिचर्सने लैस असते. या कारवर वादळ असो की बुलेट असो की बॉम्ब… कशाचाही परिणाम होत नाही.  कशानेही साधं खरचटणारही नाही, अशा पद्धतीने या कार तयार केलेल्या असतात. प्रत्येक सहा वर्षानंतर पंतप्रधानांची कार बदलली जात असते. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च प्रमुख असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्वत ही खास काळजी घेतली जाते. पंतप्रधानांच्या शाही स्वारीतील गाड्यांची ही काही माहिती.

मर्सिडीज-Maybach S650

मर्सिडीज बेंजच्या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही कार VR 10 लेव्हल प्रोटेक्शनसोबत असते. VR 10 म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कोणत्याही कारची ही एक उच्च प्रोटेक्शन लेव्हल असते. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे अशा कारवर ना गोळी, ना बॉम्बचा कशाचाही परिणाम होत नाही. एका माहितीनुसार, Mercedes Maybach S650 ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेन कार आहे. मात्र, ही अधिकृत माहिती नाही. मात्र, यापूर्वी मोदी कोणत्या कोणत्या कारमधून प्रवास करायचे ते जाणून घेऊया.

बीएमडब्ल्यू 7 सीरीज 760 Li

लग्झरी कारच्या निर्मात्या बीएमडब्ल्यूच्या या कारचा हाय सेक्युरीटी एडीशन पंतप्रधान मोदी यांचा मनपसंत मॉडेल आहे. या कारमध्ये सुरक्षेचा मोठा बंदोबस्त ठेवलेला असतो.

महिंद्रा स्कॉर्पिओ 4X4

महिंद्रा कंपनीच्या या सामान्य कारमधूनही मोदी प्रवास करायचे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बॉम्ब आणि गोळीबारापासून बचाव होईल अशा पद्धतीने या कारचं डिझाईन करण्यात आलं होतं.

लँड रोव्हर लेंज रोव्हर एचएसई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कारमधून अनेकदा प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल. ही कार सर्वाधिक सुरक्षित होती. आयईडी ब्लास्ट आणि गोळीबारापासून संरक्षण करण्यास ही कार सक्षम होती.