Maharashtra Lockdown : महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा देशभरात काय परिणाम होणार?

| Updated on: Apr 13, 2021 | 8:37 PM

देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती तयार झालीय.

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा देशभरात काय परिणाम होणार?
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती तयार झालीय. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात जवळपास लॉकडाऊन लागणार हे निश्चित झालंय. त्यामुळे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आर्थिक गणितांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम दिसलेला नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची लागण्याची शक्यता आहे. त्याचा देशावर काय परिणाम होणार याचा हा आढावा (Know what effect will be on India after Maharashtra lockdown) .

लॉकडाऊन झाल्यास काय होणार?

मागील लॉकडाऊननंतर बाजार आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. अजूनही त्याचे परिणाम जाणवत आहेत. दिल्ली ही देशाची राजधानी असली तरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबईचं देशात खूप महत्त्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्यास त्याचा देशाच्या आर्थिक राजधानीवर देखील परिणाम होणार आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे देशातील रिटेल आणि इंडस्ट्री या दोन्ही विभागांवर मोठा दुष्परिणाम झाला. यातून देश हळूहळू सावरत होता तोच आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची नामुष्की आलीय. एक वर्षानंतर देशभरात पुन्हा लॉकडाऊनची स्थिती तयार झालीय.

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्यास सर्वाधिक फटका बसणाऱ्यांमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरन्टचाही समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या एका अहवालानुसार महाराष्ट्रातील जवळपास 20 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरन्ट अजूनही बंद आहेत. मागील लॉकडाऊनच्या झटक्याने ही हॉटेल आणि रेस्टॉरन्ट चालूच होऊ शकली नाही. जी झाली त्यातील अनेक बंद करण्याची वेळ आली. 30 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरन्ट आर्थिक तोट्यामुळे कायमचे बंद करावे लागले.

देशभरातील अनेक राज्यांचे कामगार रोजगारासाठी महाष्ट्रात

महाराष्ट्रात देशभरातील विविध राज्यांमधील लोक रोजगारानिमित्त राहतात. यात उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांचा समावेश आहे. दक्षिण भारतातील अनेक जण हॉटेल व्यावसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आहेत. या सर्वांवर महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा मोठा परिणाम होणार आहे. काही ठिकाणी तर लॉकडाऊनच्या शक्यतेनेच कामगारांनी आपआपल्या गावी जाण्याचे प्रयत्न सुरु केलेत. त्यामुळे रेल्वेला देखील मोठ्या प्रमाणात ट्रेन्स सोडाव्या लागल्या आहेत. दररोज मोठ्या संख्येने कामगार महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आपल्या मूळ गावी परतत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याचा या राज्यांवर मोठा परिणाम होईल.

लॉकडाऊन नंतर उद्योगांवर दुष्परिणाम, लाखो लोक संकटात

मागील वर्षी लॉकडाऊनने उद्योगांवर मोठा दुष्परिणाम झाला. महाराष्ट्रात जवळपास 30 लाख कर्मचारी हॉटेल इंडस्ट्रीत काम करतात. एका अहवालानुसार यातील 40 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. कठोर निर्बंधांसह या आकड्यात वाढ होत आहे. लॉकडाऊननंतर यात मोठी वाढ होणार आहे. रिटेल सेक्टरमध्ये एकट्या मुंबईत 10 लाखपेक्षा अधिक अकुशल कामगार काम करतात. यातील अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. ज्यांची नोकरी राहिल त्यांच्या वेतनात कपात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Johnson & Johnson Vaccine : भारतात येण्याआधीच अमेरिकेकडून ‘या’ कोरोना लसीवर बंदी, कारण काय?

भारत सरकार ज्या रशियन लसीच्या वापराला मंजुरी देणार आहे ती नेमकी कशी काम करते? वाचा सविस्तर

Corona Vaccination : केंद्र सरकारकडून रशियाच्या Sputnik V लसीला मंजुरी, लवकरच लसीकरणाला सुरुवात

व्हिडीओ पाहा :

Know what effect will be on India after Maharashtra lockdown