लखनऊ: प्रियंका गांधींचा गेस्ट हाऊसमध्ये झाडू मारतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असताना, आता प्रशासनाकडून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रियंका गांधींना झाडू मिळाला कसा?, गेस्ट हाऊसमध्ये धूळ आलीच कशी? याबाबत चौकशी होणार आहे. लखीमपूर खीरीला (Lakhimpur Kheri) जात असताना पोलिसांनी (Police) काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधींना (Priyanka Gandhi) ताब्यात घेतलं, आणि त्यानंतर त्यांना पीएसी गेस्ट हाऊसमध्ये (PAC Guest House) नजरकैदेत ठेवण्यात आलं. याचवेळी त्यांचा या गेस्टहाऊसमध्ये झाडू मारतानाचा व्हिडीओ समोर आला. ( Lakhimpur Kheri: Investigation begins on where garbage came from in PAC guest house swept by Priyanka Gandhi )
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनावर चांगलाच दबाव तयार झाला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन याबाबत एक अहवालही तयार केला. त्यात असं समजलं की, प्रियंका गांधींच्या स्टाफ सदस्याने गेस्ट हाऊस कर्मचाऱ्याकडे झाडू मागितला. त्यानंतर त्यांना हा झाडू देण्यात आला. झाडू मिळाल्यानंतर प्रियंका गांधींनी स्वत: या गेस्टहाऊसमध्ये झाडू मारला, ज्याचा व्हिडीओ प्रियंका गांधींच्या स्टाफने शूट केला आणि नंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.
पाहा व्हिडीओ:
Smt @priyankagandhi is cleaning UP’s garbage… pic.twitter.com/IJpTuQwpoO
— Assam Congress (@INCAssam) October 4, 2021
रोज गेस्ट हाऊसची सफाई, तरी धूळ कशी आली?
ज्या गेस्ट हाऊसमध्ये प्रियंका गांधींना ठेवण्यात आलं होतं, त्या गेस्ट हाऊसमध्ये 4 खोल्या आहेत. या चारही खोल्यांच्या साफसफाईसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे गेस्ट हाऊस बूक असो वा नसो, याची दररोज साफसफाई केली जाते. प्रियंका गांधींना या गेस्ट हाऊसमध्ये व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलचं पालन करुन ठेवण्यात आलं होतं. त्यानुसार, प्रियंका गांधी येण्याआधी या रुम साफ असणं गरजेचं होतं, असं असतानाही या गेस्ट हाऊसमध्ये धूळ आली कशी? असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
45 सेकंदाचा व्हिडीओ
प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीतापूरच्या पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं होतं. या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. झाडू मारतानाचा प्रियंका गांधी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत प्रियंका गांधी एकट्याच दिसत आहे. संपूर्ण रुम रिकामी आहे. त्या या रुममध्ये झाडू मारताना दिसत आहेत. प्रियंका यांना पीएसीच्या 22 व्या बटालियनच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं होतं.
प्रियंका ते तुला घाबरले
प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. “प्रियंका, मला माहीत आहे तू मागे हटणार नाहीस. तुझ्या हिंमतीमुळे ते तुला घाबरले आहेत. न्यायाच्या या अहिंसक लढाईत आपण देशातील अन्नदात्याला विजय मिळवून देऊच,” असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
प्रियंका, मैं जानता हूँ तुम पीछे नहीं हटोगी- तुम्हारी हिम्मत से वे डर गए हैं।
न्याय की इस अहिंसक लड़ाई में हम देश के अन्नदाता को जिता कर रहेंगे। #NoFear #लखीमपुर_किसान_नरसंहार
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 4, 2021
हेही वाचा: