नवी दिल्लीः लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या, 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारला साक्षीदारांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले होते. (Lakhimpur Kheri Voilence of Uttar Pradesh Supreme Court hearing tomorrow)
फौजदारी प्रक्रिया (CrPC) च्या कलम 164 अंतर्गत इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी जलद करण्याचे पण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. खंडपीठाने राज्य सरकारकडे चार आंदोलक शेतकर्यांवर गाडी चडवल्यानंतर, एका पत्रकाराची आणि श्याम सुंदर नावाच्या व्याक्तीची जमावाने केलेल्या कथित हत्येचा अहवालही मागवला होता.
3 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यादरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत असताना लखीमपूर खीरी येथे एका गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले होते. या हिंसाचारात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला होता. ज्यात दोन भाजप कार्यकर्ते, एक ड्रायवर आणि एका पत्रकाराचा सामावेश होता.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह अनेक आरोपींना अटक केली आहे.
दोन वकिलांनी लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी करणारे पत्र सरन्यायाधीशांना लिहले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
Other News
‘मी मास्टरमाईंड नाही, वानखेडेंशी माझा संपर्क नाही’, सुनील पाटील यांचं माध्यमांसमोर स्पष्टीकरण#SunilPatil #NawabMalik #AryanKhan #MohitKamboj #Kidnap #RansomCase pic.twitter.com/UeAvP4JVQO
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 7, 2021