उत्तरप्रदेश – पाच राज्याच्या निवडणुकींचा प्रसार आता जोमात आल्याचं पाहायला मिळतंय, प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराला अधिक मतं कशी मिळतील यांची आखणी केली आहे. त्यामुळे कुणाला अधिक मिळणार किंवा कोणता पक्ष विजयी होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. परंतु प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांनी नुकताच एक जाहीरनामा केला आहे. त्यात त्यांनी असं म्हणटलंय की आम्हाला शेतक-यांची काळजी असल्याने आम्ही सत्तेत आल्यास 10 दिवसांच्या आत शेतक-यांचं संपुर्ण कर्ज (farmer loan) माफ करू असं म्हणटल्याने राजकारण अधिक तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. 10 दिवसांच्या आत शेतक-यांचं संपुर्ण कर्ज माफ करू असं वक्तव्य केल्याने त्याचा काँग्रेसच्या (congress) नेत्यांना किंवा उमेदवारांना मतदानावेळी किती फायदा होईल हे सुध्दा पाहणं औत्सुक्याचे ठरले. कारण 5 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला हरवण्यासाठी काँग्रेसने चांगली खेळी केली असल्याची सुध्दा युपीत चर्चा आहे. अखिलेश यादव, योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातली राजकीय लढाई यंदा आपण जिंकू असं प्रियांका गांधी जनतेला ठासून सांगितलं आहे.
LIVE: कांग्रेस का उन्नति विधान |
उत्तर प्रदेश के उज्जवल भविष्य का विधान
#यूपी_का_उन्नति_विधान
https://t.co/QYSZIAlA3C— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 9, 2022
20 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करणार
काँग्रेसला युपीत संधी मिळाल्यानंतर 10 दिवसांच्या संपुर्ण शेतक-यांची कर्ज माफी करण्यात येईल. आज काँग्रेसकडून तिसरा जाहीर प्रसिध्द करण्यात आला त्यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच युपीच्या राजकारणाला धरून अनेक मुद्दे त्यांनी जाहीर केलेल्या मसुद्यात मांडल्या आहेत. यूपीमधील महिला आणि तरुणांसाठी निवडणूक आश्वासनांचा जाहीरनामा जाहीर करणाऱ्या काँग्रेसने रोजगार आणि महागाई हे राज्यातील सर्वात मोठे मुद्दे म्हणून ओळखून सत्तेवर निवडून आल्यास 20 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. आज जाहीर केलेल्या विविध गोष्टींमुळे काँग्रेस पक्षाची बाजू मजबूत होईल असं अनेकांचं म्हणणं आहे.
सर्वसमान्याच्या हिताचा निर्णय
“आम्ही आतापर्यंत तीन जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत, त्यात महिलांसाठी, तरुणांसाठी आणि आज सर्वसामान्यांसाठी सर्व गरजेच्या गोष्टी घेतल्या आहेत. सर्व काही जनतेच्या सूचनांवर आधारित आहे. आम्ही एक लाख लोकांशी बोललो असून सामान्य लोक, कामगार, शेतकरी आणि सर्व लोकांच्या हिताचा जाहीरनामा प्रसिध्द केला असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले.
अर्थसंकल्पावरती टीका
या महिन्यात मंजूर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवरती ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की मोठ्या व्यावसायिकांसाठी मोठी आश्वासने असली, तरी छोट्या व्यापाऱ्यांसाठी काहीही नव्हते. आम्ही कानपूर आणि मुरादाबाद सारखे अनेक व्यवसाय आणखी मजबूत करू आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत करू असंही त्यांनी जनतेला सांगितलं.