मतदान होण्यापूर्वी कंगना राणावतने सांगितला फ्यूचर प्लॅन, जाहीर केल्या दोन महत्वाकांक्षा

| Updated on: May 20, 2024 | 10:23 AM

BJP candidate from Mandi, Kangana Ranaut: मंडी लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार कंगना रणावत हिच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह निवडणूक मैदानात आहे. भाजपने या जागेवर प्रथम महिलेस आणि बॉलीवूडमधील कलाकाराला तिकीट दिले आहे.

मतदान होण्यापूर्वी कंगना राणावतने सांगितला फ्यूचर प्लॅन, जाहीर केल्या दोन महत्वाकांक्षा
Kangana Ranaut
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलीवूड कलाकार आणि हिमाचलमधून मंडी लोकसभा निवडणूक लढवणारी कंगना रणावत नेहमी चर्चेत असते. सध्या प्रचारसभांमधून कंगना विरोधकांवर जोरदार हल्ले करत आहे. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काय करणार? यासंदर्भात कंगनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंगनाने आपल्या दोन महत्वकांक्षा जाहीर केल्या आहेत. कंगना म्हणाली, अभिनेत्री म्हणून मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री देऊन माझा गौरव झाला होता. परंतु आता येणाऱ्या काळात मला ‘एमपी ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाल्यावर खूप आनंद होणार आहे. तसेच त्यानंतर मंत्री म्हणून काम करणे किंवा एखादी मोठी जबाबदारी मिळाल्यास ती पार पडणार आहे. परंतु सध्या तरी मंडीच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे, असे कंगना रणावत हिने म्हटले आहे.

वैयक्तीक घोषणा नाही, मोदीच्या गॅरंटीवर काम

कंगना हिने म्हटले आहे की, सध्या वैयक्तीक काही घोषणा करणार नाही. आमच्या पक्षाने ‘मोदी की गॅरंटी’मध्ये अनेक विकास कामे दिली आहेत. यामुळे वेगळा वैयक्तीक विकास आराखडा राबवण्याची गरज नाही. ‘मोदी की गॅरंटी’मध्येच काम करणार आहे. आम्हाला पक्षाकडून यासंदर्भात प्रोटोकॉल दिला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही आश्वासने देऊन चालणार नाही. आम्ही ज्या गोष्टी पूर्ण करणार आहोत, तोच विषय बोलणार आहे.

हे सुद्धा वाचा

कंगना रणावत

कंगना विरोधात असा आहे सामना

मंडी लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार कंगना रणावत हिच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह निवडणूक मैदानात आहे. भाजपने या जागेवर प्रथम महिलेस आणि बॉलीवूडमधील कलाकाराला तिकीट दिले आहे. कंगनावर टीका करताना विक्रमादित्य सिंह म्हणाले, कंगना एका महिन्यासाठी राजकीय पर्यटनावर आहे. चार जून नंतर त्या दिसणार नाही. पुन्हा बॉलीवूडमध्ये काम सुरु करणार आहे.

विक्रमादित्य सिंह यांच्या टीकेला उत्तर देताना कंगना रणवात म्हणाली, काँग्रेसमध्ये दोन पप्पू आहे. दिल्लीत एक मोठा पप्पू तर हिमाचलमध्ये एक छोटा पप्पू आहे. हिमाचल प्रदेशातील चार जागांवर १ जून रोजी मतदान आहे. मंड लोकसभा मतदार संघात 13 लाख 77 हजार 173 मतदार आहे. त्यात 6 लाख 98 हजार 666 पुरुष, तर 6 लाख 78 हजार 504 माहिला आहेत.