भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्या. त्यात गरिबांना पुढील ५ वर्षे मोफत धान्य मिळणार आहे. जेनरीक औषधी ८० टक्के स्वस्त देण्यात येणार आहे, ही आश्वासने आहे. तसेच ७० वर्षांवरील लोकांसाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणण्यात येणार आहे. प्रत्येकाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे. गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील, अशी मोदींची गँरटी आहे. गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल याची आम्ही काम करणार आहे. इको टुरिझमसाठी नवी केंद्र सुरु करणार आहेत. 5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु केले जाणार आहे. सरकारच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करण्यात येत आहे. टेलिमेडिसिनचा विस्तार केला जात आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्याला ‘मोदी की गारंटी’ हे नाव देण्यात आले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जानेवारी 2024 रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर 15 लाखांपेक्षा जास्त सूचना आल्या होत्या.