नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काही महिने बाकी असताना भाजपासाठी एक चांगली बातमी आहे. साथ सोडून गेलेला एक घटक पक्ष पुन्हा भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये येणार आहे. यामुळे उत्तरेकडच्या एका महत्वाच्या राज्यात भाजपाची ताकत वाढणार आहे. लोकसभा निवडमुकीत भाजपासमोर आव्हान सोपं नाहीय. काही राज्यात प्रादेशिक पक्ष भाजपा विरोधात एकत्र आले आहेत. सोबत काँग्रेसही आहे. मागच्या दहा वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे.
प्रस्थापित सरकारविरोधात एक जनमत असतं. त्याशिवाय विरोधी पक्षांच एकत्र येणं. त्यामुळे भाजपासाठी पुढच्यावर्षी होणारी लोकसभेची निवडणूक सोपी नाहीय.
कधी शिक्कामोर्तब?
दरम्यान त्याआधी भाजपाला थोडासा दिलासा देणारी एक बातमी आहे. बिहारमधील एक मोठा पक्ष भाजपासोबत येणार आहे. एलजेपी (रामविलास) गटाची भाजपासोबत आघाडी जवळपास निश्चित आहे. चिराग पासवान लवकरच याची अधिकृत घोषणा करु शकतात. चिराग पासवान दिल्लीमध्ये आहेत. भाजपाच्या मोठ्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर या डीलवर शिक्कामोर्तब होऊ शकते.
भाजपाकडून कोणी चर्चा केली?
चिराग पासवान भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी तयार झालेआहेत. लोकसभेच्या चार आणि राज्यसभेच्या एका जागेची डील झाली आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे नेते आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय चिराग पासवान यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.
किती जागांची मागणी केलेली?
9 जुलैला चिराग पासवानने सांगितलं होतं की, दोन-तीन बैठकानंतर काही मुद्दे निश्चित होतील. चिराग पासवान लोकसभेच्या 6 आणि राज्यसभेच्या एका जागेवर अडून बसले होते. भाजपा सोबत बऱ्ंयाच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अनेक मुद्यांवर चिराग पासवानने भाजपाने थेट समर्थन केलं होतं. एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या मुद्यावर थोडी वाट पाहा अस सांगून ते थेट उत्तर देणं टाळायचे.
समाजावर कोणाची पकड?
पासवान समाजावर चिराग पासवानची मजबूत पकड आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना याची कल्पना आहे. रामविलास पासवान यांच्यानंतर एलजेपीचे खरे नेते चिराग पासवान आहेत. पशुपतिनाथ पारस गटाच्या पाच खासदारांसोबत भाजपा कसं डील करणार? या बद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जातायत. पारस गटाला लोकसभेची एक जागा दिली जाऊ शकते. हाजीपूर सीट चिराग पासवानच्या एलजेपीला देण्यास भाजपा राजी झालं आहे.