भारताच्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप, रशियाचा मोठा दावा

| Updated on: May 09, 2024 | 11:12 AM

Lok Sabha Elections 2024 : मारिया झाखारोवा यांनी म्हटले की, अमेरिकेकडून सुरु असलेले प्रकार म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे आहे. हा प्रकार म्हणजे भारताचा अवमान करणे आहे. अमेरिका सातत्याने भारतावर खोटे आरोप करत आहेत.

भारताच्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप, रशियाचा मोठा दावा
पुतीन
Follow us on

भारतात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. निवडणुकीचे तीन टप्पे झाले आहेत. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आता या निवडणुकीसंदर्भात रशियाने मोठा दावा केला आहे. अमेरिका भारताच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा रशियाने केला आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, असे रशियाने म्हटले आहे.

काय म्हटले रशियाने

रशियाची सरकारी न्यूज एजन्सी आरटी न्यूजनुसार, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी सांगितले की, अमेरिका भारताच्या राजकीय परिस्थितीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भारताची राजकीय समज आणि इतिहास माहीत नाही. भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अमेरिकेच्या अहवालाच्या संदर्भात झाखारोवा यांनी हे विधान केले आहे. अमेरिका सातत्याने भारताच्या धार्मिक स्वतंत्र्याबद्दल खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत. भारतातील अंतर्गत राजकीय परिस्थिती बिघडवणे आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण करणे हे अमेरिकेचे उद्दीष्ट असल्याचा आरोप रशियाने केला आहे.

हे सुद्धा वाचा

हा तर भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप

मारिया झाखारोवा यांनी म्हटले की, अमेरिकेकडून सुरु असलेले प्रकार म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे आहे. हा प्रकार म्हणजे भारताचा अवमान करणे आहे. अमेरिका सातत्याने भारतावर खोटे आरोप करत आहेत. त्यांना भारताच्या इतिहास माहीत नसल्यामुळे ते असे आरोप करत आहे.

गुरपतवंत सिंह पन्नू प्रकरण

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव यांनी खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नू याच्याबाबत वक्तव्य केले आहे. पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या भारतावर होत असलेल्या आरोपाबाबत त्या म्हणाले की, या प्रकरणात भारतीय नागरिकांच्या सहभागाबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. पुराव्याअभावी असे आरोप करणे चुकीचे आहे.