PM Narendra Modi : 82 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने पीएम मोदींना 510 रुपये का दिले? TV9 ने मोदींपर्यंत पोहोचवली ती रक्कम

| Updated on: May 03, 2024 | 9:53 AM

PM Narendra Modi : ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी पीएम मोदींची मुलाखत घेतली. यावेळी TV9 ने मोदींपर्यंत एका 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीचे 510 रुपये पोहोचवले. या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 510 रुपये का दिले होते?.

PM Narendra Modi : 82 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने पीएम मोदींना 510 रुपये का दिले? TV9 ने मोदींपर्यंत पोहोचवली ती रक्कम
PM Narendra Modi
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल मुलाखत झाली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी पीएम मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान पीएम नरेंद्र मोदी यांना, एका 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीचे पैसे पोहोचवण्यात आले. कोरोना काळात या वृद्ध व्यक्तीने हे पैसे दिले होते. पीएम मोदी यांनी त्या व्यक्तीचे आभार मानले. आता त्या व्यक्तीच निधन झालय. त्यावर पीएम मोदी यांनी शोक व्यक्त केला. पीएम नरेंद्र मोदी यांनी पैसे देणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा पत्ता विचारला. हे पैसे पीएम केअर फंडात जमा करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

Tv9 कन्नडचे एडिटर रंगनाथन यांनी पीएम मोदी यांना त्या 82 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीबद्दल सांगितलं. कोरोना काळात पीएम मोदींना मदत करण्याची त्यांची इच्छा होती. जेव्हा त्या वृद्ध व्यक्तीला विचारलं की, तुम्हाला काय मदत हवीय. त्यावर वृद्ध व्यक्तीने सांगितलं की, ‘मला मदत नकोय, तर मला मदत करायची आहे’

‘चीन बरोबर युद्ध सुरु होऊ शकतं’

Tv9 कन्नडचे एडिटर रंगनाथन यांनी सांगितलं की, “कोरोना काळात ते वृद्ध व्यक्ती पंतप्रधान मोदींना मदत करण्याच्या इच्छेने आले होते. त्यांनी आपल्या खिशातून 500 रुपये आणि 10 रुपयाची नोट दिली होती. देश संकटात आहे, चीन बरोबर युद्ध सुरु होऊ शकतं, मला देशाला मजबूत करायच आहे, त्यामुळे पीएम मोदींपर्यंत ही मदत पोहोचवा असं त्यांनी सांगितलेलं”

पीएम केअर फंडात जमा होणार रक्कम

82 वर्षाच्या त्या व्यक्तीने दर महिन्याला 500 रुपये देण्यासाठी येणार, ते तुम्ही मोदींपर्यंत पोहोचवा असं सांगितलेलं. पण पुढच्या महिन्यात ते आले नाहीत. कारण ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. Tv9 ने पीएम मोदींना ते पैसे दिले. पीएम केअर फंडात हे पैसे जमा करणार असल्याच मोदींनी सांगितलं.