नवी दिल्ली | 14 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने १४ मार्च रोजी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू (बलविंदर संधू ) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. आता या नावांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय घेतली. त्यानंतर अधिसूचना काढण्यात येणार आहे. दरम्यान या प्रक्रियेसंदर्भात आपण असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी नवीन नियुक्तीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यानुसार पुनर्गठन करण्यात आलेल्या या पॅनेलच्या पहिल्या नियुक्त्या आहेत. भारताच्या सरन्यायाधीशांना सोडून निवड समितीमध्ये आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि नियुक्त केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश आहे.
#WATCH | After the meeting of selection committee to pick the Election Commissioner, the Leader of Congress in Lok Sabha, Adhir Ranjan Chowdhury says, "In this committee, govt has the majority….One Mr Kumar from Kerala and one Mr B. Sandhu from Punjab have been selected as… pic.twitter.com/lZrZwFGhyz
— ANI (@ANI) March 14, 2024
ज्ञानेश कुमार हे केरळमधील तर सुखबीर संधू हे पंजाबमधील आहे. सुखविंदर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार १९८८ बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत.यापूर्वी ते गृहमंत्रालयात होते. कलम ३७० संदर्भात निर्णय घेताना ते गृहमंत्रालयात होते.
आपल्याकडे २१२ नावे एका दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे रात्रभर मी विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी सहा नावे माझ्याकडे दिली आहे. त्यानंतर आपण या प्रक्रियेबाबत असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नावे समितीने निश्चित केली आहे. आता ही नावे राष्ट्रपतीकडे जातील. त्यानंतर राष्ट्रपती या नावांवर अंतिम मोहोर उमटवतील.
फेब्रुवारीमध्ये अनुप पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर, तीन सदस्यीय निवडणूक आयोगामध्ये आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार राहिले होते. गोयल, ज्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता, परंतु त्यांनी 9 मार्च रोजी राजीनामा दिला.