लोकसभा निवडणुकीत यंदा एग्झिट पोलचे निकल फोल ठरले. एनडीएला ४०० पार दाखवणाऱ्या एग्झिट पोलच्या अंदाजानंतर प्रत्यक्षात एनडीए २९१ जागांवरच थांबली. निकालात अनेक केंद्रीय मंत्री पराभूत झाले आहेत. काही माजी मुख्यमंत्र्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांचाही समावेश आहे. अपक्ष उमेदवार आतंकी फंडींगचा आरोपी अब्दुल रशीद शेख उर्फ इंजिनियर रशीद याच्याकडून ते पराभूत झाले आहेत. अब्दुल रशीद २०१९ पासून तुरुगांत आहे. तसेच आणखी एका उमेदवाराने कारागृहात राहून विजय मिळवला आहे. खलिस्तान समर्थक वारिस दे पंजाबचा प्रमुख अमृतपालसिंग हा विजय झाली आहे. त्याने पंजाबमधील खड्डसाहेब तेथून निवडणूक लढवली होती. त्याला पावणेदोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. तो आसाममधील तुरुंगात आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जागेवर रशीद इंजिनियर याने विजय मिळवला. त्याने माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला. उमर यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपला पराभव मान्य केला होता. या जागेवर रशीद यांचा विजय आश्चर्यकारक आहे. कारण सध्या ते तिहार तुरुंगात आहेत. त्याने तुरुंगातून निवडणूक लढवली आहे.
रशीदवर अतिरिक्यांना फंडिंग केल्याचा आरोप आहे. तो तुरुंगात असताना त्यांच्या दोन मुलांनी संपूर्ण निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले. जम्मू-काश्मीरमध्ये राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सच्या मियां अल्ताफ यांच्याकडून त्यांचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव झाला.
पंजाबमध्येही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक आणि खलिस्तानी संघटना ‘वारीस पंजाब दे’ पंजाबचे प्रमुख अमृतपाल सिंग खदूर साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झाला आहे. त्याने काँग्रेस उमेदवार कुलबीर सिंग झिरा यांचा पराभव केला. ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद आहे.