Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी होणार आहे. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे. वेगवेगळी माध्यमे ओपिनियन पोल जाणून घेत आहेत. देशातील जनतेचा मूड काय आहे याबाबत माध्यमं सर्व्हे करतात. आता News18 ने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा भाजपचे सरकार बनू शकते. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA सलग तिसऱ्यांदा केंद्रात ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. एनडीएला 400 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ओपिनियन पोलनुसार, लोकसभेच्या 543 जागांपैकी एनडीएला 411 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत 350 जागा मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भाजपने ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. दुसरीकडे भाजपने अनेक प्रादेशिक पक्षांसोबत युती केली आहे. ज्यामध्ये जनता दल (युनायटेड) आणि तेलुगु देसम पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा यात समावेश आहे. अशा प्रकारे एनडीएला 61 जागा मिळण्याची शक्यता आहे. विरोधात असलेल्या इंडिया आघाडीला 105 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 27 जागांवर इतर पक्षांचा विजय होऊ शकतो.
एनडीए आघाडीला ४८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया भारताला 32 टक्के मत मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 20 टक्के मते मिळू शकतात.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ऐतिहासिक विजय मिळू शकतो. एनडीएला उत्तर प्रदेशात 77 जागा, मध्य प्रदेशात 28 जागा, छत्तीसगडमध्ये 10 जागा, बिहारमध्ये 38 जागा, झारखंडमध्ये 12 जागा आणि कर्नाटकमध्ये 25 जागा मिळू शकतात. तर ओडिशामध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 25, तेलंगणात 8 आणि आंध्र प्रदेशमध्ये 18 मध्ये जागा मिळू शकतात. गुजरातमध्ये एनडीए आघाडीला सर्व 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर एनडीएला तामिळनाडूमध्ये 5 आणि केरळमध्ये 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
ओपिनियन पोलनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो. लोकसभेच्या 350 जागा भाजपला मिळू शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 49 जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या इतर मित्रपक्षांना 56 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय AIADMK, BSP, BRS, BJD, YSRCP इत्यादींसह इतरांना 27 जागा मिळू शकतात.