Loksabha election : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात किती उमेदवार रिंगणात

| Updated on: May 16, 2024 | 5:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी २०१९ मध्ये ४.८ लाखांनी तर २०१४ मध्ये ३.७२ लाख मतांनी त्यांनी निवडणूक जिंकली होती. आता त्यांच्या विरोधात अनेक उमेदवार उभे आहेत.

Loksabha election : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात किती उमेदवार रिंगणात
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे कॉमेडियन श्याम रंगीला यांचा उमेदवारी अर्ज बाद आला आहे. या जागेवरुन 41 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता त्यापैकी 33 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा जागेसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा येथून निवडणूक लढवत आहेत. मोदींमुळे ही हॉट सीट बनली आहे. अशा परिस्थितीत मोदींना आव्हान देण्यासाठी अनेक जण मैदानात उतरले आहेत. यातील अनेक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेत.

३३ जणांचे अर्ज फेटाळले

पंतप्रधान मोदींसह 41 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर 33 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. वाराणसीच्या जागेवर आता फक्त आठ उमेदवार आहेत. या जागेवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 मे आहे. जर कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर मोदींसह आठ उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

नरेंद्र मोदी यांची नक्कल करणारे प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीला यांचा उमेदवारी अर्ज आवश्यक प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यामुळे बाद झाला आहे. श्याम रंगीला यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पंतप्रधान मोदींनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्यादिवशी त्यांना जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले होते की, “जिंकणे किंवा हरणे ही वेगळी बाब आहे, पण मी कोणत्याही किंमतीत पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. मी प्रसिद्ध होण्यासाठी निवडणूक लढवत नाही, मी आधीच जनतेमध्ये प्रसिद्ध आहे.”

का फेटाळला श्याम रंगीला यांचा अर्ज

श्याम रंगीला यांनी वाराणसी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयावर अनेक आरोप केले, त्यापैकी एक म्हणजे उमेदवारी दाखल करताना त्यांना मदत करण्यात आली नाही. श्याम रंगीला यांच्या या आरोपांवर वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी होत्या आणि औपचारिकता पाळण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की रंगीला यांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले कारण त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अपूर्ण आढळले आहे. वाराणसी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी X वर लिहिले, “तुमच्या उपस्थितीत तुमच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली आणि तुम्हाला कमतरतांबद्दल माहिती देण्यात आली.

तुम्ही सादर केलेले प्रतिज्ञापत्र अपूर्ण होते. तुम्ही शपथ/प्रतिज्ञापत्र घेतले नव्हते, ज्याच्या आदेशाची प्रत तुम्हालाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्याम रंगीला यांनी नामांकन भरताना ज्या कागदपत्रांची छाननी केली जाते त्यामध्ये उमेदवाराने शपथ घेतली आहे की नाही यावर खूण केली आहे. मला शपथ घ्यायची आहे असे कोणी सांगितले नाही. आता ते म्हणत आहेत की मी शपथ घेतली नाही म्हणून माझे अर्ज फेटाळण्यात आले.”

दोन वेळा मोदींचा विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघ तिसऱ्यांदा विजयाची आशा आहे. मोदींनी मागील निवडणुका मोठ्या फरकाने जिंकली होती. २०१९ मध्ये ४.८ लाखांनी तर २०१४ मध्ये ३.७२ लाख मतांनी त्यांनी निवडणूक जिंकली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून अजय राय मैदानात आहेत. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अथर जमाल लारी हे आहेत. अजय राय हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पाच वेळा उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि मोदींकडून त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते समाजवादी पक्षात होते. यापूर्वी ते भाजपमध्ये होते. 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

अपना दल (कामेरवाडी) कडून गगन प्रकाश, राष्ट्रीय समाजवादी जनक्रांती पक्षाचे पारस नाथ केशरी, युग तुलसी पक्षाचे उमेदवार कोळी शेट्टी शिवकुमार आणि दोन अपक्ष उमेदवार संजयकुमार तिवारी आणि दिनेशकुमार यादव या जागेवरुन रिंगणात आहेत. केंद्रात पहिले सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान मोदी 2014 पासून लोकसभेत वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात वाराणसीमध्ये १ जून रोजी मतदान होणार आहे.