Loksabha election : राज ठाकरे-अमित शाह यांची भेट, पण महायुतीचं घोडं अडलं कुठं?

| Updated on: Mar 20, 2024 | 9:04 PM

Amit shah-Raj thackeray : लोकसभा निवडणुकीच्या आधी गृहमंत्री अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात दिल्लीत बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. पण अजूनही महायुतीत मनसे येणार की नाही याची घोषणा झालेली नाही. त्यामुळे घोडं कुठे अडलंय जाणून घ्या.

Loksabha election : राज ठाकरे-अमित शाह यांची भेट, पण महायुतीचं घोडं अडलं कुठं?
Follow us on

MNS-BJP alliance : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. पण यानंतकृर ही मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत अजून कुठलीही घोषणा झालेली नाही. या भेटीनंतर मुंबईत भाजपची मनसेसोबत कुठलीही बैठक झालेली नाही. राज ठाकरे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट होऊन 24 तास उलटले आहेत. मात्र राज ठाकरे मुंबईत येवूनही महायुतीत सहभागी होण्यावरुन हालचाली झालेल्या नाहीत. आता 1-2 दिवस वाट बघा, नंतर सविस्तर बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विधानसभेला महायुतीत येणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेऐवजी मनसे विधानसभेला महायुतीत एकत्र येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांना लोकसभेत जागा देण्याऐवजी राज्यसभेचा पर्याय देण्याची शक्यता आहे. विधानसभेवरुनही अमित शाह-राज ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. मनसेनं लोकसभेला प्रचारात मदत करावी विधानसभेत विचार करु असं चर्चा झाल्याचंही कळतं आहे.

मनसे सोबत आल्यास दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडली जावू शकते अशी चर्चा होती. मात्र दक्षिण मुंबईतून भाजपचे इच्छुक राहुल नार्वेकरांनी प्रचार सुरुच ठेवलाय. जवळपास 20 दिवसांपासून नार्वेकर दक्षिण मुंबईचा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दक्षिण मुंबईत भाजपचाच उमेदवार असावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत.

राऊतांची राज ठाकरेंवर टीका

संजय राऊतांनी पुलवामा हल्ल्यानंतरच्या राज ठाकरेंच्या टीकेवर बोट ठेवलंय. लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्र सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर शंका उपस्थित केली होती. मोदी आणि शाहांवर काढलेल्या व्यंगचित्रावरुनही संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही मनसेवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्यानंच एवढी महायुती असतानाही नवे पक्ष लागतात, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

मनसे महायुतीत येणार का ? मनसेला लोकसभेच्या जागा मिळणार की विधानसभेला मनसेची महायुतीत एंट्री होणार, असे अनेक प्रश्न आहेत. पण फडणवीस म्हणतात त्याप्रमाणं 2 दिवसांत चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अजूनही हा सस्पेंस कायम आहे.