Accident News | पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाताना भाजपा कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात

| Updated on: Sep 25, 2023 | 10:53 AM

Accident News | कुठे झाला अपघात?. पार्क केलेल्या ट्रकला बसची धडक. 'कार्यकर्ता महाकुंभ'साठी 10 लाख कार्यकर्ते जमवण्याच उद्दिष्टय भाजपाने ठेवलं आहे.

Accident News | पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाताना भाजपा कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात
Follow us on

भोपाळ : भाजपा कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन येणारी बस सोमवारी पार्क केलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात बसमधील 39 भाजपा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. ‘कार्यकर्ता महाकुंभ’ मेळाव्यासाठी हे कार्यकर्ते चालले होते. आज 25 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘कार्यकर्ता महाकुंभ’ला संबोधित करणार आहेत. भोपाळमध्ये हा मेळावा होत आहे. खरगौन जिल्ह्यात हा अपघात झाला. कासरावड जवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलय.

अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे भाजपा कार्यकर्ते खापरजामली, रुपगढ आणि राय सागर भागातील आहेत. जनसंघाचे सहसंस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘कार्यकर्ता महाकुंभ’च आयोजन केलं आहे. यावर्षी मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून आतापासूनच या निवडणुकासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मागच्या 45 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा तिसरा मध्य प्रदेश दौरा आहे. काँग्रेससोबत मध्य प्रदेशात भाजपाच अटी-तटीचा सामना होऊ शकतो. सत्ता टिकवण हे भाजपासमोरील मुख्य आव्हान आहे.



किती लाख कार्यकर्ते जमवण्याच उद्दिष्टय?

‘कार्यकर्ता महाकुंभ’साठी 10 लाख कार्यकर्ते जमवण्याच उद्दिष्टय भाजपाने ठेवलं आहे. याच कार्यक्रमासाठी जाताना भाजपा कार्यकर्त्यांच्या बसला अपघात झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपाला शक्तीप्रदर्शन करायचं आहे. पुढच्यावर्षी देशात लोकसभेची निवडणूक आहे. त्याआधी आधी होणारी विधानसभा निवडणूक सेमीफायनल आहे. लोकसभेला मध्य पदेशातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी विधानसभेला सत्ता येणं महत्त्वाच आहे.