आठ वर्षाच्या मुलीला वाचवताना दुर्घटना, 40 लोक विहिरीत पडले, चौघांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरु

| Updated on: Jul 16, 2021 | 9:44 AM

विहिरीत पडलेल्या मुलीच्या बचावकार्यदरम्यान (Rescue Operation) जमलेल्या गर्दीमुळे मध्य प्रदेशात भीषण दुर्घटना (Madhya Pradesh) घडली. विहिरीचा कठडा तुटल्यामुळे जवळपास 40 लोक विहिरीत पडले.

आठ वर्षाच्या मुलीला वाचवताना दुर्घटना, 40 लोक विहिरीत पडले, चौघांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरु
Madhya Pradesh many people fell into a well last
Follow us on

भोपाळ : विहिरीत पडलेल्या मुलीच्या बचावकार्यदरम्यान (Rescue Operation) जमलेल्या गर्दीमुळे मध्य प्रदेशात भीषण दुर्घटना (Madhya Pradesh) घडली. विहिरीचा कठडा तुटल्यामुळे जवळपास 40 लोक विहिरीत पडले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला तर 11 जण अजूनही बेपत्ता आहेत. आतापर्यंत 16 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशातील विदिशा इथं गुरुवारी रात्री ही भीषण दुर्घटना घडली.

आठ वर्षांची मुलगी खेळता खेळता 40 फूट विहिरीत पडली. याबाबतची माहिती गावभर पसरल्यानंतर, गावकऱ्यांनी परिसरात एकच गर्दी केली. त्यावेळी सुरु असलेल्या बचावकार्यादरम्यान, विहिरीभोवतीचा भाग खचला आणि जमलेली गर्दी आहे तशी विहिरीत कोसळली. गर्दीचा प्रचंड भार विहिरीच्या कठड्यावर पडला (Well Boundary Break) आणि तो तुटल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं (MP Police)सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त 

या दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच त्यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

दुसरीकडे मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी दिलेल्या महितीनुसार, काल रात्रीच अनेकांना वाचवण्यात आलं. यामध्ये 13 लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे स्वत: लक्ष ठेवून आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

खेळता खेळता चिमुकली विहिरीत कोसळली

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री चिमुकली खेळता खेळता विहिरीत कोसळली. याची माहिती क्षणार्धात गावात पसरली. त्यामुळे गावकऱ्यांनी विहिरीभोवती एकच गर्दी केली. या गर्दीचा भार विहिरीच्या संरक्षक कठड्यावर पडला आणि तो तुटून जवळपास 40 जण विहिरीत पडले.

संबंधित बातम्या   

Mumbai Rain Live | मुंबईत पावसाचं धुमशान, रात्रीपासून जोरदार पाऊस, लोकलची वाहतूक कोलमडली