अंदमान निकोबार भूकंपाने हादरले, भूकंपाचे झटके बसतात नागरिकांनी ठोकली घराबाहेर धूम

| Updated on: Jul 29, 2023 | 8:22 AM

शनिवारी रात्री उशिरा 1 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी लोक गाढ झोपेत होते. अचानक धरती हल्ल्याने घरातील भांड्यांची पडझड झाली. त्यामुळे लोकांना जाग आली.

अंदमान निकोबार भूकंपाने हादरले, भूकंपाचे झटके बसतात नागरिकांनी ठोकली घराबाहेर धूम
earthquake
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निकोबार | 29 जुलै 2023 : अंदमान निकोबार बेटावर शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेजच्या अनुमानानुसार या भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता 5.8 एवढी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत 10 किलोमीटरवर होता. या भूकंपामुळे अंदमान निकोबार हादरून गेलं आहे. भूकंपाचे झटके जाणवताच लोक घाबरून गेले. जीवमुठीत घेऊन हे लोक घराच्याबाहेर पळाले. मात्र, या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवीत वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक भयभीत झाले होते.

शनिवारी रात्री उशिरा 1 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी लोक गाढ झोपेत होते. अचानक धरती हल्ल्याने घरातील भांड्यांची पडझड झाली. त्यामुळे लोकांना जाग आली. भूकंपाचे धक्के जाणवल्याचं लक्षात येताच या लोकांनी तात्काळ घरातून पळ काढला. आहे त्या अवस्थेत लोक घराबाहेर पडले. रस्त्यावरच त्यांनी आसरा घेतला. लोक भयभीत झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता दिसत होती. बराच काळ या लोकांनी कुटुंबकबिल्यासह रस्त्यावर काढला. त्यानंतर भूकंपाचा पुन्हा धक्का बसला नसल्याचं लक्षात आल्यानंतर लोक आपआपल्या घरात गेले.

हे सुद्धा वाचा

अफगाणिस्तान हादरले

शुक्रवारी आफगाणिस्तानात संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची रिश्टर स्केलवरील तीव्रता 4.2 एवढी नोंदवली गेली. यापूर्वी 23 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी आफगाणिस्तानात भूकंप आला होता. त्याची तीव्रता 4.6 एवढी नोंदवली गेली होती.

अरुणाचलमध्येही जोरदार धक्के

अरुणाचल प्रदेशातही शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. अरुणाचल प्रदेशातील पँगिन येथील उत्तरेकडे हे भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची रिश्टर स्केलवर 4.0 एवढी तीव्रता नोंदवल्या गेली होती. मात्र, या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. यापूर्वी अरुणाचलच्या तवांगमध्ये 22 जुलै रोजी 3.3 तीव्रतेचा भूकंप आला होता.