महालक्ष्मी हत्या प्रकरणात ज्याच्यावर संशय त्याच्याच मृतदेह सापडल्याने खळबळ

| Updated on: Sep 25, 2024 | 10:35 PM

बंगळुरूमधील महालक्ष्मी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचाच मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळल्याने प्रकरण आता आणखी किटकट झाले आहे. महालक्ष्मीचा खून कोणी आणि का केला हे अजून समोर आलेले नाही. पतीने अश्रफ नावाच्या व्यक्तीवर आरोप केला आहे. महिलेचा मृतदेह तिच्या घराच्या फ्रीजरमधून तुकडे केलेल्या अवस्थेत सापडला होता.

महालक्ष्मी हत्या प्रकरणात ज्याच्यावर संशय त्याच्याच मृतदेह सापडल्याने खळबळ
Follow us on

बंगळुरुमधील महालक्ष्मी हत्याकांडाला वेगळंच वळण लागलं आहे. महालक्ष्मीच्या हत्येचा ज्याच्यावर संशय होता त्याच्याच मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. महालक्ष्मीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ५९ तुकडे करणाऱ्या या घटनेतील प्रमुख संशयिताने ओडिशात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलाय. आरोपी हा महालक्ष्मीचा प्रियकर असून त्याचे नाव मुक्ती रंजन रॉय असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी देखील याला दुजोरा दिला आहे. मुक्ती रंजन रॉय यांचा मृतदेह ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धुसुरी पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात सापडला आहे. आता ही आत्महत्या आहे हत्या हे अजून समोर येऊ शकलेलं नाही. स्थानिक पोलिसांनी बंगळुरू पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. स्थानिक पोलिसांकडून देखील मुक्तीचा शोध सुरु होता. त्यानंतर आज त्याच्या मृतदेह अशा प्रकारे आढळला आहे. त्यामुळे हत्या प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार रॉय मंगळवारी त्यांच्या गावी गेला होता, मात्र त्यानंतर तो घराबाहेर पडला नाही. त्याचा मृतदेह गावाच्या सीमेवर आढळून आलाय. कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली असून पोलिसांनी तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

पतीचे अश्रफवर आरोप

बंगळुरू शहर पोलिसांनी महालक्ष्मीच्या हत्येतील प्रमुख संशयित म्हणून मुक्तीचा शोध सुरु केला होता. पण आता त्याचाच मृतदेह सापडल्याने बंगळुरु पोलीस ही चक्रावले आहेत. या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला, महालक्ष्मीचा पती हेमंत दास याने त्यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर अश्रफ नावाच्या व्यक्तीवर हत्येचा आरोप केलाय. उत्तराखंडमधील रहिवासी असलेल्या अश्रफचे महालक्ष्मीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला आहे.

29 वर्षीय सेल्सवुमन असलेली महालक्ष्मी सप्टेंबरच्या सुरुवातीपासून दिसली नव्हती. त्यानंतर शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यानंतर 21 सप्टेंबर रोजी तिचा कुजलेला मृतदेह तिच्या अपार्टमेंटच्या रेफ्रिजरेटरमध्ये सापडला होता. पोलीस आता या घटनेचा तपास कर असून नेमकी हत्या कोणी केली याचा शोध घेत आहेत.