राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्र नंबर वन; निकाल जाहीर होण्याचं घोंगडं अडलं कुठं?

| Updated on: Feb 03, 2022 | 3:27 PM

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर पथसंचलन झालं. यावेळी देशभरातील चित्ररथांच्या माध्यमातून संस्कृतीचं प्रदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्रानेही आपला चित्ररथ सादर केला. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आलं होतं.

राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्र नंबर वन; निकाल जाहीर होण्याचं घोंगडं अडलं कुठं?
राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्र नंबर वन; निकाल जाहीर होण्याचं घोंगडं अडलं कुठं?
Follow us on

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्ताने (Republic Day Parade 2022) राजपथावर पथसंचलन (delhi rajpath) झालं. यावेळी देशभरातील चित्ररथांच्या माध्यमातून संस्कृतीचं प्रदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्रानेही आपला चित्ररथ (maharashtra chitrarath) सादर केला. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या चित्ररथाने अनेकांची मने जिंकून घेतली. या चित्ररथांना पुरस्कार देण्यासाठी ऑनलाईन मतदानही मागवण्यात आलं. देशभरातील नागरिकांनी या ऑनलाईन मतदानास मोठा प्रतिसादही दिला. त्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक मतदान झालं. मात्र, प्रजासत्ताक दिन होऊन आठ दिवस उलटले तरी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक मतदान झालं म्हणून तर केंद्र सरकार चित्ररथांच्या पुरस्काराची घोषणा करत नाही ना? असा सवाल केला जात आहे. केंद्राकडूनही पुरस्काराची घोषणा का केली नाही याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

राजधानी दिल्लीत राजपथावरील चित्ररथासाठी यंदा ऑनलाईन मतदान मागवण्यात आलं होतं. त्यात महाराष्ट्राच चित्ररथ पहिल्या क्रमांकावर आहे. पण अजून या स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला नाही. एरव्ही परेड झाल्यावर दुसऱ्याच दिवशी रात्रीपर्यंत या स्पर्धेचे निकाल जाहीर होत असतात. मात्र, यंदा चित्ररथ स्पर्धेच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ऑनलाईन स्पर्धेत महाराष्ट्रातील चित्ररथाला सर्वाधिक मते मिळाल्यामुळे तर ही घोषणा केली जात नाही ना? अशी चर्चाही नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

महाराष्ट्राला किती मते?

या चित्ररथ स्पर्धेत जम्मू-काश्मीरच्या चित्ररथाला 12 हजार 124 मते मिळाली आहेत. म्हणजे या चित्ररथाला 12 टक्के मते मिळाली आहेत. कर्नाटकाच्या चित्ररथाला 9 टक्के म्हणजे 9 हजार 25 मते मिळाली आहेत. महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक 23 टक्के म्हणजे 22 हजार 649 मते मिळाली आहेत. मेघालयाच्या चित्ररथाला 3451, पंजाबच्या रथाला 6116, उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला 22 टक्के म्हणजे 21 हजार 585 आणि उत्तराखंडच्या चित्ररथाला 4091 मते मिळाली आहेत.

महाराष्ट्राच्या चित्ररथात काय?

महाराष्ट्र सरकारने यंदा ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित हा चित्ररथ तयार केला होता. या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. यावर फळांचा राजा आंबा, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राष्ट्रीय पक्षी मोर, फुलपाखरू इत्यादींच्या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. खार, सरडा झाड, वाघ आणि महाकाय फुलपाखरू धातूपासून बनविण्यात आले होते. झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा, असा संदेश महाराष्ट्राने दिला. जणू काही संपूर्ण जंगल की दुनियाच या चित्ररथावर अवतरल्याचा भास होत होता. महाराष्ट्राचा चित्ररथ नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तरूणांनी तयार केला होता. चांगला चित्ररथ बनवल्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आहे. या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची असून निर्मिती संचालक बिभीषण चावरे आहेत. त्यांच्या संकल्पनेतून ही जंगलची दुनिया चित्ररथावर साकारण्यात आली होती. तर, या चित्ररथाचं समालोचन बीग बी अमिताभ बच्चन यांनी केलं होतं.

 

संबंधित बातम्या:

शानदार, रुबाबदार, दिमाखदार, प्रजासत्ताक सोहळ्यातला एक Video निवडायचा झाला तर तो हाच !

Drone farming | जमलंच गड्या! इकडं अर्थमंत्र्यांनी सांगितलं अन् भंडाऱ्याच्या बहाद्दरानं ड्रोन शेतीचा प्रयोगही केला!

BMC Budget 2022: सर्वांना पाणी, घराशेजारीच आरोग्य केंद्र, कचरा करणाऱ्यांकडून ‘वापरकर्ता शुल्क’ आकारणार; निवडणुकीच्या तोंडावर पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर