कल्याण ठाण्याचा सस्पेन्स संपला, महायुतीमध्ये या दोन्ही जागांवर असा निर्णय

| Updated on: Mar 31, 2024 | 12:28 PM

kalyan thane lok sabha constituency: विद्यमान खासदार डॅाक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेतूनच लढणार आहे. ठाणे लोकसभेकरता उमेदवाराचे नाव जवळपास फायनल झाले आहे. लवकरच ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी महायुतीची महाप्रचार रॅली काढण्यात येणार आहे.

कल्याण ठाण्याचा सस्पेन्स संपला, महायुतीमध्ये या दोन्ही जागांवर असा निर्णय
eknath shinde and devendra fadnavis
Follow us on

लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपाचा विषय अजूनही रखडला आहे. त्यात कल्याण, ठाणे, नाशिक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जागांवर तिढा कायम आहे. परंतु आता ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत या जागांवर निर्णय घेण्यात आला. या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. त्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या ठिकाणी एक-दोन दिवसांत शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.

 

शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित

भाजपाने ठाणे, कल्याण लोकसभा मतदार संघावर दावा केला होता. परंतु शिवसेनेचा बालेकिल्ला त्यांच्याकडे अबाधित राहिला आहे. ठाणे, कल्याण लोकसभेच्या जागा शिवसेनेच्याच बाजूने गेल्या आहेत. भाजप श्रेष्ठींनीच ठाणे, कल्याण लोकसभेच्या जागा शिवसेनेच्याच असल्याचा निर्वाळा दिला आहे. शनिवारी रात्री ‘वर्षा’वरील बैठकीत ठाणे आणि कल्याण लोकसभा जागेबाबत निर्णय झाला. या दोन्ही जागा शिवसेनेलाच देण्याचा निर्णय झाला.

हे सुद्धा वाचा

अद्याप हा निर्णय बाकी, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच

बैठकीत नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदूर्ग लोकसभा जागेवरुन चर्चा झाली. त्यावर विजयी होणार उमेदवार देण्यात येणार आहे. तसेच दोन दिवसांत ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभेसाठी शिवसेना आपला उमेदवार जाहीर करणार आहे. विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेतूनच लढणार आहे. ठाणे लोकसभेकरता उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. लवकरच ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी महायुतीची महाप्रचार रॅली काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाप्रचार रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.

स्थानिक भाजप नेत्यांकडून कल्याण आणि ठाणे लोकसभेच्या जागांची मागणी केली जात होती. तसेच या जागांसंदर्भात भाजपने केलेल्या सर्व्हेतून भाजप उमेदवारास अनुकूल वातावरण असल्याचा दावा केला जात होता. परंतु या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार राहतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याला भाजप श्रेष्ठींनीही मान्यता दिली. यामुळे या जागांवरील तिढा आता संपला आहे.