गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील दहेगाम तालुक्यात गणेश विसर्जनाच्या वेळी १० जणांचा बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना दहेगाम वसना सोगाठी गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनासाठी लोक गेले होते. भाविकांपैकी 10 जण चेक डॅममध्ये बुडाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पाच जणांचा शोध सुरू आहे. अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी राज्यातील पाटण जिल्ह्यात उघडकीस आली होती. गणेश विसर्जनाच्या वेळी बुडून चौघांचा मृत्यू झाला.
याआधी पाटण शहरातील सरस्वती बॅरेजवर गणेश विसर्जनासाठी आलेले पाटण येथील वेराई चकला परिसरातील रहिवासी असलेल्या प्रजापती कुटुंबातील सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नयन रमेशभाई प्रजापती, नयन रमेशभाई प्रजापती, जितीन नितीनभाई प्रजापती आणि दक्ष नितीनभाई प्रजापती अशी मृतांची नावे आहेत.
10 दिवसांच्या गणपती उत्सवादरम्यान, भक्त साधारणपणे दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांनी हत्तीमुखी देवाच्या मूर्तींना निरोप देतात. अंतिम विसर्जन प्रक्रिया शेवटच्या दिवशी (अनंत चतुर्दशी) होते. यावर्षी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला उत्सवाची सांगता होणार आहे.