केरळच्या वायनाड जिल्ह्यात मेप्पडीजवळ डोंगराळ भागात मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस कोसळत असतानाच येथे भूस्खलन झालं. यानंतर चहूबाजूला सर्वत्र विनाश, उद्धवस्त झाल्याच्या खूणा दिसत आहेत. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती आहे. फायर फोर्स आणि एनडीआरएफच्या टीम्सना प्रभावित क्षेत्रात तैनात केल्याची माहिती केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. एनडीआरएफची एक टीम वायनाड येथे पोहोचली आहे. सैन्याने सुद्धा येथे पाचारण केलं आहे. वेगात सेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी, मृतांची संख्या वाढून 24 झाल्याच सांगितलं. सहा मृतदेह मेप्पाडी सामुदायिक आरोग्य केंद्र आणि 5 खासगी मेडीकल कॉलेजमध्ये आहेत.
केरळच्या वायनाडमधील मेप्पाडी पंचायतीत भूस्खलनामुळे मोठ नुकसान झालय, असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलय. शेकडो लोक अडकले असण्याची भिती आहे. सैन्याच्या चार तुकड्या घटनास्थळी आहेत. 122 इन्फँट्री बटालियनच्या (प्रादेशिक सेना) दोन तुकड्या आणि कन्नूर डीएससी सेंटरच्या दोन तुकड्या यामध्ये आहेत. वैथिरी, कलपट्टा, मेप्पाडी आणि मनंतवडी रुग्णालयाला अलर्टवर ठेवलं आहे. वायनाड येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणखी टीम्स तैनात करण्यात येतील.
पावसामुळे हेलिकॉप्टर्सच उड्डाण अशक्य
राष्ट्रीय आरोग्य मिशनने एक कंट्रोल रुम सुरु केलाय. इमर्जन्सी मदतीसाठी 9656938689 आणि 8086010833 हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. एअर फोर्सचे दोन हॅलिकॉप्टर्स MI-17 आणि ALH रेस्क्यू मिशनसाठी तैनात आहेत. पण मुसळधार पाऊस सुरु असल्याने त्यांना उड्डाण करण शक्य होत नाहीय. “काल रात्री वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याच ऐकून दु:ख झालं. प्रभावित कुटुंबांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याची मी राज्य सरकारला अपील करतो” असं केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Distressed by the landslides in parts of Wayanad. My thoughts are with all those who have lost their loved ones and prayers with those injured.
Rescue ops are currently underway to assist all those affected. Spoke to Kerala CM Shri @pinarayivijayan and also assured all possible…
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2024
पीएम मोदींनी काय मदत जाहीर केली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन म्हटलय की, “वायनाडच्या काही भागात भूस्खलन झाल्याच ऐकून मी व्यथित आहे. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलय, त्यांच्यासोबत माझ्या सर्व संवेदना आहेत. जखमींसाठी मी प्रार्थना करतो. प्रभावित लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु आहे. केरळचे मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन यांच्याशी मी बोललो. केंद्र सरकार सर्व सहकार्य करेल” भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या नातवेईकांना पीएम मोदी यांनी 2 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येईल.