Mallikarjuna Kharge: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची ईडीकडून चौकशी सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

| Updated on: Apr 11, 2022 | 2:12 PM

Mallikarjuna Kharge: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात खरगे यांची चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने खरगे यांना नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितलं होतं.

Mallikarjuna Kharge: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची ईडीकडून चौकशी सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची ईडीकडून चौकशी सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (mallikarjuna kharge) यांची ईडीने (ed) चौकशी सुरू केली आहे. नॅशनल हेराल्ड (national herald ) प्रकरणात खरगे यांची चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने खरगे यांना नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर खरगे आज सकाळी 11 वाजता स्वत:हून ईडीच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हापासून त्यांची अजून चौकशी सुरू आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या आर्थिक अनियमिततेची ईडीकडून चौकशी सुरू आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012मध्ये या प्रकरणी ट्रायल कोर्टात तक्रार दाखल केली होती. काही काँग्रेस नेते यंग इंडियन लिमिटेडद्वारा जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणाच्या फसवणूक आणि विश्वासघाताच्या प्रकरणात सहभागी होते, असा दावा या तक्रारीत करण्यात आला होता. दरम्यान, खरगे यांची ईडीने चौकशी सुरू केल्याने दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नॅशनल हेराल्डची सुरुवात केली होती. या प्रकरणात स्वामी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रौदा यांचाही उल्लेख केला आहे.

काय आहे प्रकरण?

2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. कंपनीवर 90 कोटींचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटींच कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहन केलं होतं. 2012मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते.

कोर्टाची नोटीस

या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य आरोपींकडून उत्तर मागितलं होतं. न्यायामूर्ती सुरेश कैत यांनी गांधी कुटुंबाला नोटीस बजावले होते. तसेच ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रौदा आणि यंग इंडियाला 12 एप्रिलपर्यंत स्वामींच्या याचिकेवर आपली बाजू मांडण्यास सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:

JNU News : इकडे येचुरींना मुदतवाढ मिळाली अन् तिकडे हिंसा भडकली; अमित मालवीय यांनी सांगितलं JNU हिंसेचं कनेक्शन

UP Government : युपीत ट्विटर अकाउंट हॅक करण्याचे सत्र सुरूचं, यूपी सरकारचे ट्विटर अकाउंट हॅक

Kirit Somaiya: सेव्ह विक्रांतचा निधी राज्यपालांना दिल्याचं सोमय्यांचं पत्रं व्हायरल, किती निधी दिला?; राऊतांचा दावा खरा की खोटा?