Sharad Pawar for President:ममतांकडूनही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना आग्रह?, उद्याच्या 22 पक्षांच्या बैठकीआधी ममता पवारांच्या भेटीला

| Updated on: Jun 14, 2022 | 5:21 PM

शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे यावे, अशी इच्छा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी व्य़क्त केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून याबाबतची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. ममता बॅनर्जीही बैठकीपूर्वी पवारांच्या भेटीला 6 जनपथ या पवारांच्या निवासस्थानी आल्यामुळे शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, अशी विनंती त्या करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Sharad Pawar for President:ममतांकडूनही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना आग्रह?, उद्याच्या 22 पक्षांच्या बैठकीआधी ममता पवारांच्या भेटीला
Mamta meets Pawar
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential election)दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी पुढाकार घेणाऱ्या ममता बॅनर्जी (Mamta Banrjee)या शरद पवारांच्या (Sharad Pawar)निवासस्थानी त्यांच्या भेटीला पोहचल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार निश्चित करण्यासाठी 22 पक्षांची बैठक उद्या दिल्लीत बोलवली आहे. त्यात विरोधकांकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात येणार आहे. तर या निवडणुकीत विरोधकांचा एकच उमेदवार असावा अशी भूमिका काँग्रेस अध्यक्षा सोनिायंनी घेतली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे या भूमिकेसाठी विरोधकांच्या भेटी घेत आहेत. शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे यावे, अशी इच्छा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी व्य़क्त केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून याबाबतची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. ममता बॅनर्जीही बैठकीपूर्वी पवारांच्या भेटीला 6 जनपथ या पवारांच्या निवासस्थानी आल्यामुळे शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, अशी विनंती त्या करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पवार अनुत्सुक?

शरद पवारांच्या नावाबाबत राष्ट्रीय पातळीवर विरोधकांकडून एकमत होण्याची शक्यता असली तरी शरद पवार ही निवडणूक लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे सांगण्यात येते आहे. भाजपा आणि एनडीएचे संख्याबळ पाहता ही निवडणूक भाजपासाठी सोपी असल्याचे मानण्यात येते आहे. दुसरीकडे भाजपाही सर्वसहमतीने एकच राष्ट्रपतीपदाचा उमेदवार व्हावा, यासाठीही प्रय़त्नशील असल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र राज्यात महिविकास आघाडीचा प्रयोग करणारे शरद पवारांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या बड्या नेत्यांचा पाठइंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत पराभव होईल असे स्पष्ट दिसत असताना निवडणूक लढण्यास पवार तयार नसल्याचे सांगण्यात येते आहे.

राष्ट्रवादीने मानले सर्व नेत्यांचे आभार

दरम्यान राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचे नाव सुचवणाऱ्या सगळ्यांचे पक्षाच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला सर्व विरोधक उपस्थित राहणार आहेत, या बैठकीला शरद पवारही उपस्थित राहतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. आता उद्याच्या निवडणुकीत पवार काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. पवारांच्या नावाला काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर कितीसंमती मिळेल याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येते आहे. या स्थितीत सर्व विरोधकांचा एकत्रित एक उमेदवार कोण ठरणार याकडे देशाचे लक्ष असेल.