मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात हिऱ्याच्या खाणी आहेत. तिथे खोदाकाम करताना एका व्यक्तीला 1 कोटी रुपये किंमतीचा हिरा सापडला. एका हिऱ्याने त्या व्यक्तीला कोट्यधीश बनवलं. पण आजही त्याच्या कुटुंबाची दोनवेळच्या जेवणासाठी परवड होत आहे. यामागच कारण आहे, हिऱ्याचा अजून लिलाव झालेला नाही. आदिवासी समुदायातून येणारा हा व्यक्ती सध्या पीएम आवासच्या घरात राहत आहे. मोठ कुटुंब असल्याने बेताची परिस्थिती आहे. दोनवेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. या व्यक्तीच्या डोक्यावर कर्ज आहे. या हिऱ्याचा लवकरात लवकर लिलाव झाला पाहिजे, अशी कुटुंबियांची मागणी आहे.
खाण भाड्यावर घेऊन खोदकाम करणाऱ्या आदिवासी कुटुंबाच नशीब फळफळलं. पण त्यांना अजून त्याचं फळ मिळालेलं नाही. या आदिवासी कुटुंबाने कर्ज काढून हिऱ्याची खाण भाड्यावर घेतली होती. त्यांच्या या मेहनीला फळ मिळालं. त्यांना 19 कॅरेटचा हिरा सापडला. पण हिऱ्याचा लिलाव होत नसल्याने राजूच्या कुटुंबाची हालत खराब झाली. राजूला हिरा सापडल्यानंतर त्याने तो हिरा कार्यालयात जमा केला. तेव्हापासून राजू हिऱ्याचा लिलाव कधी होणार? या प्रतिक्षेत आहे. जेणेकरुन त्याचे बुरे दिन संपुष्टात येतील.
हिरा जमा करताना हिरा कार्यालयातून किती लाख मिळाले?
खाणीसाठी मी लोकांकडून कर्ज घेतलं होतं. घरातूनही भरपूर पैसे घेतले होते असं राजूने सांगितलं. हिरा जमा करताना हिरा कार्यालयातून राजूला 1 लाख रुपये देण्यात आले होते. पण त्याचे ते सर्व पैसे खर्च झाले. दिवाळीपर्यंत लिलाव होईल असं हिरा कार्यालयातील लोक सांगत होते. पण दिवाळीमध्ये हिऱ्याचा लिलाव झाला नाही.
राजूला पैशांची इतकी निकड का?
राजू आदिवासीची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्याचं कुटुंब पीएम आवास योजनेतंर्गत बांधलेल्या घरात राहतं. कुटुंब मोठ असल्याने राजूने शेजारीच एक झोपडी बनवली आहे. त्यात राजूची आई, पत्नी, छोटा भाऊ राहतो. स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता आहेच पण सोबतच दुसऱ्यांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी सुद्धा पैसे हवे आहेत. हिऱ्याचा लवकर लिलाव झाला असता, तर मदत मिळाली असती असं त्याच्या कुटुंबाने म्हटलं आहे.