Manipur violence : “मणिपुरचे तुकडे पडू देणार नाही”; बिरेन सिंह यांनी त्या आमदारांची मागणी फेटाळून लावली

| Updated on: May 16, 2023 | 12:45 AM

मणिपूर सरकारने नुकत्याच जारी केलेल्या आदेशात असंही सांगण्यात आले आहे की, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यासारख्या विविध सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Manipur violence : मणिपुरचे तुकडे पडू देणार नाही; बिरेन सिंह यांनी त्या आमदारांची मागणी फेटाळून लावली
Follow us on

इंफाळ: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी सोमवारी कुकी बहुल या जिल्ह्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला फेटाळून लावले आहे. यासाठी 10 आमदारांनी मागणी केली होती. यामध्ये कुकी पीपल्स अलायन्सचे दोन आणि एक अपक्ष अशा सात भाजपच्या आमदारांचा समावेश आहे. याप्रकरणावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मणिपूरच्या अखंडतेला आम्ही कोणताही धक्का पोहचू देणार नाही.

मणिपूरमध्ये चिन-कुकी-मिझो-झोमी गटातील 10 आदिवासी आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून वेगळ्या राज्याची मागणी केली होती.

तर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सोमवारी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ही मागणी केली होती.

तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सांगितले की, या परिस्थितीत राज्याच्या अखंडतेवर परिणाम होणार नाही. तर त्याच वेळी, अमित शाह यांनी आश्वासन दिले आहे की केंद्र सध्याच्या परिस्थितीला ठामपणे सामोरे जाईल आणि मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थितीसाठी काम करेल.

त्यामुळे लोकांनी स्वतंत्र राज्याच्या अफवांवर आणि इतर गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मणिपूर सरकारने नुकत्याच जारी केलेल्या आदेशात असंही सांगण्यात आले आहे की, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यासारख्या विविध सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या आदेशात पुढे म्हटले आहे की, आंदोलक आणि आंदोलकांना सोशल मीडियावरील माहितीचा वापर करून एकत्र केले जात आहे आणि त्यांना तोडफोड आणि जाळपोळ करण्यास भाग पाडले जात आहे.

मणिपूरच्या काही जिल्ह्यांतून हिंसाचाराच्या काही घटनांची नोंद झाल्यानंतर मात्र काही तासांतच ही बैठक बोलवण्यात आली होती. पहाडी राज्यातही वेगळाच हिंसाचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.