पावसासाठी तयार राहा ! पाहा यंदा पावसाबाबत काय आलीये गुडन्यूज

| Updated on: May 27, 2024 | 8:21 PM

केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे आता लवकरच मान्सून भारतात दाखल होणार आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढील पाच दिवस हवामानात बदल दिसून येतील आणि ते केरळमध्ये दाखल होईल. IMD ने उष्णतेच्या लाटेचा देखील इशारा दिला आहे.

पावसासाठी तयार राहा ! पाहा यंदा पावसाबाबत काय आलीये गुडन्यूज
Follow us on

Monsoon Update: सध्या महाराष्ट्रासह उत्तर भारतात प्रचंड उष्णतेचा तडाखा बसत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यूच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. त्यातच आता भारतीय हवामान खात्याने (IMD) लोकांना एक सुखद बातमी दिली आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त मान्सून पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD म्हटले आहे की, “सांख्यिकीय दृष्टीकोनातून समजून घेतल्यास, संपूर्ण देशात नैऋत्य मान्सूनमुळे होणारा हंगामी पाऊस ± 4 टक्के मॉडेल त्रुटीसह सरासरीच्या (LPA) 106% असण्याची शक्यता आहे.”

हवामान खात्याने म्हटले आहे की, “देशात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत हा पाऊस होणार आहे.” भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात मान्सून सामान्यपेक्षा जास्त राहील, असे आयएमडीने म्हटले आहे. भारताच्या ईशान्य भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. उत्तर-पश्चिम भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. येत्या ५ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी पाऊस कमी झाला

गेल्या वर्षी भारतात ९४ टक्के पाऊस झाला होता. भारतातील एकूण पावसापैकी 70 टक्क्यांहून अधिक पाऊस हा नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात होतो. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर भारतातील नैऋत्य मान्सूनचा वेग स्पष्ट होतो.

आयएमडीने स्पष्ट केलंय की, जूनमधील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. IMD ने जूनमध्ये उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशाच्या लगतच्या भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस जास्त राहण्याची शक्यता वर्तवली आहे.