Vice President Election:मार्गारेट अल्वा असणार विरोधकांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार, जाणून घ्या राजकीय प्रवास..

| Updated on: Jul 17, 2022 | 6:01 PM

2008 साली विधानसभा निवडमुकांच्या काळात अल्वा यांनी काँग्रेस हायकमांडवर तिकिटे विकत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांना महासचिव पदावरुन हटवले होते. अल्वा त्यावेळी महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब आणि हरियाणाच्या प्रभारी होत्या. गांधी परिवाराशी निकटचे संबंध असल्यामुळे नंतर त्यांना उत्तराखंडच्या राज्यपालपदी संधी मिळाली होती.

Vice President Election:मार्गारेट अल्वा असणार विरोधकांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार, जाणून घ्या राजकीय प्रवास..
मार्गारेट अल्वा यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – उपराष्ट्रपतीपदाची (Vice President Election)निवडणूक ही एनडीएचे जगदीप धनखड विरुद्ध युपीएच्या मार्गारेट अल्वा यांच्याविरोधात रंगणार हे नक्की झालेले आहे. विरोधकांनी एकत्रित राज्यसभेच्या माजी राज्यपाल, काँग्रेसच्या महिला नेत्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva)यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी ही घोषणा केली. ८० वर्षीय मार्गारेट अल्वा मूळच्या कर्नाटकच्या मंगळुरुच्या रहिवासी आहेत. अल्वा यांनी राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले होते. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संसदीय कार्य आणि युवक कल्याण मंत्रालयांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तर नरसिंहराव सरकारमध्येही त्यांनी मंत्रिपद भूषवले.

विरोधकांनी दिलेली उमेदवारी हा गौरव- अल्वा

उपराष्ट्रपतीपदासाठी युपीएच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर, त्यांनी ट्विट करुन या उमेदवारीबाबत विरोधी पक्षांचे आभार मानले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मिळालेली उमेदवारी हा गौरव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच ही उमेदवारी स्वीकारत असून, ही संधी दिल्याबद्दल सर्व विरोधी पक्षांचे त्यांनी आभारही मानले आहेत.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>It is a privilege and an honour to be nominated as the candidate of the joint opposition for the post of Vice President of India. I accept this nomination with great humility and thank the leaders of the opposition for the faith they’ve put in me. <br><br>Jai Hind ??</p>&mdash; Margaret Alva (@alva_margaret) <a href=”https://twitter.com/alva_margaret/status/1548636129636671489?ref_src=twsrc%5Etfw”>July 17, 2022</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

गुजरात राजस्थानसह 4 राज्यांच्या राज्यपालपदी

मार्गारेट अल्वा यांनी गुजरात, राजस्थान, गोवा आणि उत्तराखंडचे राज्यपालपदही सांभाळले आहे. उत्तराखंडचा पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. 2009 ते 2012 या काळात त्या उत्तराखंडच्या राज्यपाल होत्या. तसेच 2012 ते 2014 या काळात त्या राजस्थानच्या राज्यपालपदीही राहिल्या आहेत. याच काळात त्यांच्याकडे गुजरात आणि गोव्याचा प्रभारही सोपवण्यात आला होता.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर केला होता तिकिट विकत असल्याचा आरोप

2008 साली विधानसभा निवडमुकांच्या काळात अल्वा यांनी काँग्रेस हायकमांडवर तिकिटे विकत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांना महासचिव पदावरुन हटवले होते. अल्वा त्यावेळी महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब आणि हरियाणाच्या प्रभारी होत्या. गांधी परिवाराशी निकटचे संबंध असल्यामुळे नंतर त्यांना उत्तराखंडच्या राज्यपालपदी संधी मिळाली होती.