वयाच्या नवव्या वर्षी मॅट्रिक, बावीसाव्या वर्षी IIT मध्ये प्रोफेसर, पण आता बेरोजगार का?

| Updated on: Apr 13, 2023 | 2:36 PM

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात कमी वयात दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल नाव नोंदवणारा युवक आज बेरोजगार आहे. वयाच्या २२ व्या वर्षी आयआयटी मुंबईत 2010 मध्ये असिस्टंट प्रोफेसर झाला होता. परंतु असे काय झाले की त्याचा रोजगार गेला...

वयाच्या नवव्या वर्षी मॅट्रिक, बावीसाव्या वर्षी IIT मध्ये प्रोफेसर, पण आता बेरोजगार का?
तथागत अवतार तुलसी
Image Credit source: social media
Follow us on

पाटणा : सर्वात कमी वयात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेला युवक अनेकांना आठवत असेल. त्याची शैक्षणिक प्रगती खूप आलेख उंचवणारी होती. दहावी नंतर MSc अन् Phd करुन वयाच्या 22व्या वर्षी आयआयटी मुंबईत 2010 मध्ये असिस्टंट प्रोफेसर झाला. मग तो युवक गेल्या 23 वर्षांत अजून मोठा पदावर गेला असेल, असे तुम्हाला वाटणे साहजिकच आहे. परंतु तो युवक आज बेरोजगार आहे. त्याचे नाव तथागत अवतार तुलसी.

अशी होती प्रगती


वयाच्या ९व्या वर्षी मॅट्रिक, पुढच्या वर्षी B.Sc, पुढच्या वर्षी M.Sc आणि 22 व्या वर्षी आयआयटी बॉम्बेमध्ये असिस्टंट प्रोफेसरची नोकरी, असे अभिमान वाटणारे तुलसी याचे करियर होते. अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून आपल्यामधील अचाट क्षमतेमुळे तो प्रकाशझोतात आला होता. लहानपणापासून भौतिकशास्त्राशी त्याची गट्टी जमली होती. 1987 मध्ये जन्मलेले तथागत अवतार तुलसी 2010 मध्ये आयआयटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक झाला.

हे सुद्धा वाचा

वर्षभरात बदलले सर्व काही


तथागत अवतार तुलसी 2010 मध्ये रुजू झाला पण पुढच्या वर्षी 2011 मध्ये त्याला खूप ताप आला. मुंबईतील वातावरण मानवले नाही. समुद्राची हवा सहन झाली नाही. परंतु त्यानंतरही आणखी दोन वर्ष त्याने काम केले. मग 2013 मध्ये आयआयटीमधून चार वर्षांची सुट्टी घेऊन मुंबई सोडले. डिसेंबर 2017 मध्ये चार वर्षे पूर्ण झाल्यावर अ‍ॅलर्जीमुळे मुंबईला गेला नाही. गैरहजर राहिल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली. जुलै 2019 मध्ये त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सध्या तो तेव्हापासून तो पाटण्यात आहे.

आता न्यायालयीन लढाई

लहानपणापासून अनेक विक्रम करणारा तथागत अवतार तुळशी सध्या बेरोजगार आहे. त्याने नोकरी परत मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासाठी तो स्वतः कायद्याचे शिक्षण घेत आहे.

कधी काय केले

  • 1997- वयाच्या नऊव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
  • 1998 – तथागत अवतारने पाटणा विद्यापीठाच्या विज्ञान महाविद्यालयात इंटरमिजिएटला प्रवेश घेतला.
  • 1998- मुलाखतीनंतर इंटरमिजिएट परीक्षा न देता पदवी परीक्षा देण्याची सूट देण्यात आली.
  • 1999- तथागत अवतार तुलसी यांनी पाटणा विद्यापीठात M.Sc ला प्रवेश घेतला.
  • १999- तथागत एमएस्सी परीक्षा ७० टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले.
  • वयाच्या 12 व्या वर्षी एमएस्सी केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव समाविष्ट
  • 2009- तथागत अवतार तुळशीलाही पीएचडीची पदवी मिळाली, कॅनडातून ऑफर मिळाली
  • 2010 – वयाच्या 22 व्या वर्षी IIT बॉम्बेमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू
  • 2019 – दीर्घ रजेवर असल्याने IIT बॉम्बेने कामावरून काढून टाकले
  • 2023- IIT बॉम्बेमध्ये सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी मिळविण्यासाठी कायद्याचा अभ्यास

हे ही वाचा

Ratan Tata House Photos : रतन टाटा यांचे घर पहिले का? काय आहेत सुविधा जाणून घ्या?

 

दोन दिवस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट, गारपीट अन् अवकाळीचे संकट