नवीन वर्ष आता दोन दिवसांनी येणार आहे. यावेळी सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाचे स्वागत केले जाते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री मोठा जल्लोष केला जातो. त्याची तयारी अनेक दिवसांपासून तरुणाई करत असते. परंतु आता या जल्लोषावर विरजण फिरणारा फतवा मुस्लीम समाजासाठी निघाला आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी फतवा जारी केला आहे. मुस्लीम समुदायाने नवीन वर्ष साजरे करु नये, ते इस्लामविरोधात आहे, असे मौलानांनी म्हटले आहे.
शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी एक फतवा काढला आहे. त्यात म्हटले आहे की, शुभेच्छा देणे आणि कार्यक्रम आयोजित करणे हे इस्लाममध्ये बेकायदेशीर आहे. नवीन वर्षांचा जल्लोष करणे ही अभिमानाची गोष्ट नाही. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. हा ख्रिश्चन धर्मियांचा सण आहे. मुस्लिमांसाठी हे सक्त मनाई आहे.इस्लाममध्ये नृत्य आणि गाणे पूर्णपणे हराम आहे. शरियतनुसार हे काम गुन्हेगारांचे आहे. यामुळे मुस्लीम तरुणांना नवीन वर्ष साजरे न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी फतव्यात म्हटले आहे की, नवीन वर्षाची सुरुवात जानेवारीपासून होत असून हा बिगर मुस्लिमांचा धार्मिक कार्यक्रम आहे. यामुळे मुस्लिमांनी नवीन वर्ष साजरे करू नये. हे उचित नाही. नवीन वर्ष साजरे करणे, नाचणे, गाणे, फटाके फोडणे, शुभेच्छा देणे हे शरीयतनुसार बेकायदेशीर आहे.
मौलाना म्हणतात, नवीन वर्षाच्या कार्यक्रमात मुस्लीम समुदायाची लोक सहभागी होतात, ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी अशा कार्यक्रमांपासून लांब असायला हवे. इस्लाममध्ये असे कार्यक्रम बेकायदेशीर आहे. जर कोणी या पद्धतीचे वर्तन करत असेल तर तो गुन्हेगार आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाने अशा कार्यक्रमात सहभागी होऊ नये आणि गुन्हेगार होऊ नये.
सुफी फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कशिश वारसी यांनी रिझवी यांच्या या फतव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, रिझवी यांचा फतवा म्हणजे फतव्याचा कारखाना आहे. मुस्लिमांनी हे करू नये, त्यांनी असे करू नये, हे हराम आहे, ते हराम आहे, जे खरोखरच हराम आहे त्याला ते हराम म्हणणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.