नवी दिल्लीः पंजाबमध्ये लवकरच निवडणुका होणार असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांनी आज मोगा येथे एका सभेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. आम आदमी पक्षाने सरकार स्थापन केल्यास 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना 1000 रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच केजरीवाल यांनी आज रात्री एका ऑटो चालकाच्या घरी जेवण केले. खुद्द केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
एका ऑटोचालकाने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले, तेव्हा मी खूप प्रभावित झालो, असे ते म्हणाले. आम्ही तिथे जेवायला नक्की जाऊ म्हणत रात्रीच्या जेवणानंतर केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार भगवंत मान आणि अन्य एका नेत्यासोबत ऑटो राईडचा आनंदही घेतला. केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले की, ‘दिलीप तिवारी यांनी आज आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. त्याच्या कुटुंबाने खूप प्रेम दिले. अतिशय चवदार अन्न होते. मी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आता दिल्लीत माझ्या घरी जेवायला बोलावलेय.
अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये दिले जातील, असे ते म्हणाले. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक महिलेला हा लाभ मिळेल आणि ही रक्कम वृद्ध मातांना वृद्धापकाळ पेन्शनपासून वेगळी असेल.
#WATCH | Delhi CM and AAP Convenor Arvind Kejriwal took a ride in an auto-rickshaw in Ludhiana, Punjab
Later, Kejriwal had dinner at the residence of the auto-rickshaw driver pic.twitter.com/hcUOzIrEmY
— ANI (@ANI) November 22, 2021
पंजाबमध्ये बनावट केजरीवालही फिरत असल्याचे ते म्हणाले. मी जे काही वचन देऊन जातो, दोन दिवसांनी मग ते बोलतात, पण काहीच करत नाहीत. यापूर्वी त्यांनी 24 तास 300 युनिट मोफत वीज आणि पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला मोफत उपचार देण्याची दोन आश्वासनं दिलीत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “बनावट केजरीवालांनी” पंजाबमध्ये 15,000 मोहल्ला दवाखाने उभारण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेच वचन बनावट केजरीवालांनी दिल्याचं सांगत विरोधकांवर हल्लाबोल केलाय.
संबंधित बातम्या
फेसबुकवरुन शस्त्रास्त्रे, दारूगोळा विक्री, पोलीसही चक्रावले, जाणून घ्या काय आहे पाकिस्तानी लिंक
Zojila tunnel: MEIL ला मोठे यश, अखेर झोजिला बोगद्याच्या ट्युब 2 चे खोदकाम पूर्ण